

Parbhani Crime: Fatal attack on farmer
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धनगर टाकळी गावात पाण्याच्या वादातून शेजाऱ्याने शेतकऱ्यावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना ६ ऑक्टोबरला घडली असून याप्रकरणी बुधवारी (दि.८) चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन गंगाधर साखरे (वय ४१) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, ते सध्या नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. = बुधवारी चुडावा पोलिस ठाण्यात आर-ोपी विश्वनाथ लक्ष्मण साखरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन साखरे यांनी शेजारील विश्वनाथ साखरे यास तुझ्या शेतातील पाणी आमच्या शेतात येऊ देऊ नको असे सांगितले होते.
रागावलेल्या विश्वनाथ साखरेने अहिल्यादेवी होळकर चौकात गजानन साखरे यांच्यावर ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात गजानन साखरे यांना डाव्या हाताच्या मानेजवळ, डोक्यात आणि उजव्या हातावर गंभीर जखमा झाल्या. त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले.