Dhangar Reservation: ताडकळस येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको

Dhangar Reservation: ताडकळस येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको
Published on
Updated on

ताडकळस, पुढारी वृत्तसेवा: धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी' करावी. तसेच चौंडी येथील आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणार्थीना पाठिंबा देण्यासाठी ताडकळस येथे आज (दि.२६) दुपारी १२ वाजता सकल धनगर समाजाच्या वतीने रॅली काढून रास्ता रोको करण्यात आला. ताडकळस येथील मेन रस्त्यावरुन पोलीस स्टेशन मार्गे बस स्टँड, मोठा बाजार ते राज्य महामार्ग ६१ वरील पालम पाँईटपर्यत रॉली काढण्यात आली. त्यानंतर येथे रास्ता रोको करण्यात आला. Dhangar Reservation

धनगड व धनगर एकच असून, राज्य शासनाने याचा अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गात समावेश करून तसे पत्र केंद्र शासनाला पाठवावे, ६ सप्टेंबरपासून चौंडी येथील एसटी प्रवर्गाच्या आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे सुरेश बंडगर, अप्पासाहेब रूपनर यांच्या आंदोलनाची राज्य शासनाने अद्याप दखल घेतली नाही. तरी या उपोषणाची दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. Dhangar Reservation

यावेळी ताडकळस पोलीस ठाण्याचे एपीआय कपिल शेळके, पीएसआय तरटे, नागरगोजे यांना निवेदन देण्यात आले. मारोतराव पिसाळ, आनंद बनसोडे, विठ्ठल वडकुते, माजी जि. प. सदस्य माणिकराव हजारे, राजेश बालटकर, सरपंच विकाश गव्हाळे, राजेश देवकते, केशव गव्हाळे, गजानन माने, प्रल्हाद होणमने, पांडुरंग सकनुर, बबलु माने, खंडेराव वावरे, दत्तराव गाढवे, विशाल गाढवे, रुषिकेश सकनुर, कन्हैया धुळगुंडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news