महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकास दीड वर्षांची सक्तमजुरी

३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी कापूस वेचताना पीडित महिलेशी आरोपीने गैरवर्तन केले.
Baramati News
खुनाचा प्रयत्न; दहा वर्षांची सक्तमजुरी, लिंगाळी येथील घटनाPudhari File Photo
Published on
Updated on

One and a half years of hard labor for molesting a woman

मानवत, पुढारी वृत्तसेवा येथील प्रथमवर्ग न्या.पी.सी. फाटले यांच्या न्यायालयाने महिलेच्या विनयभंग, लैंगिक छळ, शिवीगाळ व धमकी प्रकरणात कृष्णा काळे रा. सावळी ता.मानवत याला दोषी ठरवत दीड वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Baramati News
Beed Crime: नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी भावाला १० वर्षे कारावास

३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी कापूस वेचताना पीडित महिलेशी आरोपीने गैरवर्तन केले. मानेवर पकड घेऊन खाली पाडणे, अश्लील मागणी करणे तसेच घटनेची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर प्रकार केले. यात मानवत पोलिसांत गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाव, पंचनामा व इतर पुरावे सादर केले.

सुनावणीदरम्यान आरोपीने राजकीय वैमनस्यातून खोटा गुन्हा लावल्याचा दावा केला, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. न्यायालयाने पीडित महिलेची साक्ष विश्वासार्ह मानत आरोपीस कलम ३५४ अंतर्गत दीड वर्षांची सक्तमजुरी व दंड, तसेच इतर कलमांखाली प्रत्येकी एक वर्षाची सक्तमजुरी व दंड अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

Baramati News
Crime News : चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांचा कारावास

आरोपीने पीडितेला १५ हजारांची भरपाई देण्याचे आदेश दिले. महिलां विरुध्द वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकरणात कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. सरकार पक्षातर्फे अॅड.पी.एम. लिहिने यांनी काम पाहिले, त्यांना अॅड. मुकुंद पाटील यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news