Crime News : चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांचा कारावास

बीड जिल्हा न्यायालयाचा निकाल; गेवराई तालुक्यातील घटना
Beed Crime News
Crime News : चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांचा कारावासpudhari photo
Published on
Updated on

Man sentenced to ten years in prison for abusing cousin

पुढारी वृत्तसेवा : गेवराई येथील एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि तिला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला असून आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीसह ५ हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

Beed Crime News
Beed Crime: नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी भावाला १० वर्षे कारावास

या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की २२ एप्रिल २०१७ रोजी पीडितेचे आई वडील आणि भाऊ बाहेर गेले असल्याचे पाहून आरोपी राहुल राका याने घरात घुसून दोन्ही दरवाजे बंद केले आणि पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार केला. यावेळी पीडितेने प्रतिकार केला असता त्याने तिला धक्काबुक्की केली.

दरम्यान पीडितेचा भाऊ अचानक घरी आल्याने आरोपी मागच्या दरवाजातून पळून गेला होता. या घटनेपूर्वी एक वर्षापासून आरोपी पीडितेला कॉलेजमधून बोलावून घेऊन तिच्यावर अत्याचार करत होता आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तिला सतत ब्लॅकमेल करत होता.

Beed Crime News
Nanded Crime | बिलोलीत मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सश्रम कारावास

पीडितेच्या तक्रारीनंतर गेवराई पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक के. के. बोर्डे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषार ोपपत्र दाखल केले.

सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकारी यांचा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरला. सहाय्यक सरकारी वकील अॅड. अजय श्रीमंतराव तांदळे यांनी या प्रकरणात सरकारची बाजू मांडली.

त्यांचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी राहुल राका याला दोषी ठरवून ही कठोर शिक्षा सुनावली. या कामात त्यांना अॅड. शशिकांत सावंत, जिल्हा सरकारी वकील अजय राख, पोलिस निरीक्षक के. के. बोरडे, महिला पोलिस कॉन्स्टेबल सविता चव्हाण आणि श्रीकांत पाखरे

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

आरोपीने स्वतःच्या चुलत बहिणीचे अश्लील व्हिडीओ काढले होते, ते व्हायरल करण्याची धमकी देत तो वारंवार अत्याचार करत होता असे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले होते. अखेर या नराधमास आता शिक्षा सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news