Parbhani Crime News : दोन विधीसंघर्ष बालकांवर कारवाई

परभणीत नानलपेठ पोलिसांकडून मोपेडसह मोबाईल, पर्स जप्त
Parbhani Crime News
Parbhani Crime News : दोन विधीसंघर्ष बालकांवर कारवाई File Photo
Published on
Updated on

Nanalpeth police detained two juveniles for stealing a moped, mobile phone and women's purse

परभणी, पुढारी वृत्तसेवा : येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यासह अन्य ठाण्याच्या हद्दीत मोपेडसह मोबाईल व महिलांच्या पर्स लंपास केल्याबद्दल दोन विधीसंघर्ष बालकांना नानलपेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन निरी-क्षणगृहात रवाना केले आहे.

Parbhani Crime News
Parbhani News : हळद पिकावर करप्याचा प्रादुर्भाव

शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पारदेश्वर महादेव मंदिराजवळ दि. २७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता देवदर्शनाकरीता निघालेल्या एका मुलीसह तिच्या आईस दोन अनोळखी मोटरसायकलस्वारांनी त्यांचे मागे येवून समांतर मोटरसायकल आणत पर्स हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन विधीसंघर्ष बालकांना दि.३० ऑक्टोंबर रोजी ताब्यात घेतले आहे. तेंव्हा त्या दोघांनी नवा मोंढा पोलिस ठाणे हद्दीत व शहरामध्ये इतर ठिकाणी निर्जन ठिकाणांवरुन चालणाऱ्या महिलांची पर्स हिसकावून चोरी केल्याची कबुली पोलिस तपासात दिली आहे.

Parbhani Crime News
C-band Doppler weather radar : परभणीत सी-बँड डॉप्लर वेदर रडार बसवण्याची खा. चव्हाण यांची मागणी मान्य !

पोलिसांनी या विधीसंघर्ष बालकांकडून एक रेडमी कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल किंमत २ हजार, एक रेडमी कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाईल किंमत ४ हजार रूपये, एक नथिंग कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल किंमत ४५ हजार, रोख २ हजार ५०० रुपये त्यात ५०० रुपयांच्या ५ नोटा, एक हिरो स्प्लेंडर प्लस काळया रंगाची दुचाकी क्रमांक एमएच २२ वीजी ७७८१ तिची किंमत २० हजार, एक निळया रंगाची होन्डा अॅक्टीवा मोपेड एमएच २२ बीडी ९५४४ तिची किंमत ६० हजार रूपये असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

या प्रकरणी दोन्ही विधीसंघर्ष बालकांविरुध्द नवा मोंढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद आहे. या विधीसंघर्ष बालकांना दि. ३१ ऑक्टोंबर रोजी बाल न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी निरीक्षण गृहात करण्यात आली आहे. याकामी नानलपेठचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सुरवाडे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत नारमोड, राहुल गोला, संतोष सानप, अंबादास चव्हाण, शोएब पठाण, विठ्ठल हेडे, जवादे, सुमेध पुंडगे, सुधाकर शिंदे, चालक कालिदास देशपांडे, चालक दवणे यांनी कामगिरी बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news