परभणी : इसाद येथील बेपत्ता शेतकऱ्याचा मासोळी नदीपात्रात आढळला मृतदेह

पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याचा संशय
Farmer's death due to drowning
बेपत्ता शेतकऱ्याचा मासोळी नदीपात्रात मृतदेह आढळला
Published on
Updated on

गंगाखेड : बैलपोळ्याच्या दिवशी शेतातील बैल आणण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा बुधवारी (दि.४) मासोळी नदीपात्रात मृतदेह आढळून आला. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडून या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव धोंडीबा भोसले (वय ५०) असे शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Farmer's death due to drowning
जळगाव : ३० लाखासाठी महिलेचा खून करून मृतदेह नदीत फेकला

याबाबतची अधिक माहिती अशी, तालुक्यातील इसाद येथील उद्धव भोसले हे २ सप्टेंबर रोजी बैलपोळाचा सण असल्याने बैल आणण्यासाठी शेतात गेले होते. मात्र ते घरी आले नाहीत. याच दरम्यान मासोळी नदीस पूर आला होता. नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. ३ सप्टेंबरला मुलगा प्रभाकर याने गंगाखेड पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असताना आज (बुधवारी) दुपारी त्यांचा मृतदेह नदी पात्राजवळील काटेरी झाडाच्या झुडप्यात आढळून आला. त्यानंतर पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

Farmer's death due to drowning
Nashik Crime Update | 'तो' खून विवाहबाह्य संबंधातून, लिव्ह इन पार्टनरवर वहिम

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news