Nashik Crime Update | 'तो' खून विवाहबाह्य संबंधातून, लिव्ह इन पार्टनरवर वहिम

खून झाल्यापासून पार्टनर फरार
Nashik Murder
'तो' खून विवाहबाह्य संबंधातून, लिव्ह इन पार्टनरवर वहिमpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : पाथर्डी शिवारातील सदाशिवनगर येथील कृष्णा प्राइड अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गुरूवारी (दि. २९) दुपारी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचा खून विवाहबाह्य संबंधातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तिच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी व्यक्ती खून झाल्यापासून फरार आहे. या घटनाक्रमामागे त्याचाच हात असल्याचा वहिम आहे.

निशा मयूर नागरे या महिलेचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला होता. कपड्याने गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. निशा ही मयूर नागरेसोबत राहत होती. घरमालकाच्या माहितीनुसार, ती मुंबईतील हॉटेलमध्ये कामास होती. तर तिच्यासोबत राहणारा मयूर नागरे याचे कोणार्कनगर येथे हॉटेल होते. घटनेनंतर तो फरार झाला. त्याने निशाचा मोबाइल व कागदपत्रेही सोबत नेल्याचे समजते. त्यामुळे निशाची ओळख पटण्यास अडचण येत होती. मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मयूरच्या नातलगांची ओळख पटवून चौकशी केली. त्यातून त्यांनाही निशाबद्दल माहिती नसल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासानुसार मयूरची पत्नी व मुलगी दसक परिसरात राहत असून तो निशासोबत अधुनमधून राहत असल्याचे समोर आले. निशाच्या नातलगांचा शोध न लागल्याने तिचा मृतदेह शवागारात आहे. पोलिसांच्या तपासात गुन्हा केल्यानंतर मयूर याने त्याच्या मित्रपरिवाराकडे अ ॉनलाइन पैशांची मागणी केली, मात्र त्यास बहुतांश जणांनी नकार दिल्याचेही समोर आले आहे.

Nashik Murder
Nashik Murder | त्या महिलेचा खूनच ; पतीचा शोध सुरूच

भाडेकरुंचा प्रश्न ऐरणीवर 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमालकांनी निशा किंवा मयूरला घर भाड्याने देताना कोणतीही कागदपत्रे घेतली नसल्याचे समजते. त्यामुळे दोघांची ओळख पटवण्यात अडचण आली. या घटनेने भाडेकरूंच्या ओळखीचा प्रश्न एेरणीवर आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news