

मानवत; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याच्या मंजूर केलेल्या ठरावाची होळी करून बुधवारी (दि. २१) सकल मराठा समाजाच्या वतीने बसस्थानकासमोर सरकारचा निषेध करण्यात आला.
फसवे आरक्षण नको, ओबीसीतूनच आरक्षण द्या, सगेसोयरे बाबत कायदा पास करा, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. मनोज जरांगे पाटील यापुढे जे आंदोलन करण्यास सांगतील त्या आंदोलनात सामील होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात सकल मराठा समाजाचे गोविंद घाडगे, सुदाम मस्के, राजेभाऊ होगे, माऊली चांगभले, लक्ष्मण शिंदे, हनुमान मस्के, आबा कदम आदी कार्यकर्ते सामील झाले होते.
हेही वाचा :