Parbhani News: लाईट फिटिंग करताना २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मानवतमध्ये दुर्घटना, नक्की काय घडलं?

मानवत शहरातील संभाजीनगर परिसरातील २७ वर्षीय तरुणाचा लाईट फिटिंगचे काम करताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली.
Parbhani News
Parbhani Newsfile photo
Published on
Updated on

Parbhani News:

मानवत: मानवत शहरातील संभाजीनगर परिसरातील २७ वर्षीय तरुणाचा लाईट फिटिंगचे काम करताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. सुरुवातीला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची चर्चा होती; मात्र शवविच्छेदनात विजेच्या शॉकचे कोणतेही स्पष्ट चिन्ह आढळून न आल्याने काम करताना उंचावरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लक्ष्मण बबन नागापूरकर (वय २७, रा. पेठ मोहल्ला, मानवत) असे मृत तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण हा इलेक्ट्रिशियनचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. ११ मे रोजी दुपारी तो जिजाऊ नगर परिसरातील दत्ता उत्तम रासवे यांच्या नवीन घरात इलेक्ट्रिकल फिटिंगचे काम करण्यासाठी गेला होता. काम सुरू असताना तो अचानक खाली कोसळल्याचे घरमालकाने पाहिले. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी मानवत येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले.

Parbhani News
Parbhani Crime News : परभणीतील बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला

ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र शवविच्छेदनादरम्यान शरीरावर विजेचा धक्का लागल्याचे कोणतेही ठोस चिन्ह आढळले नाही. उलट डोक्याला गंभीर मार लागल्याचे तसेच नाक-तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिडीवरून किंवा स्टूलवरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते, पोलीस कर्मचारी शेख गाजीउद्दीन उर्फ मुन्नू शेख, नारायण सोळंके यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नगरसेवक किशोर लाड, ज्ञानेश्वर मोरे, अभिषेक आळसपुरे, दीपक बारहाते आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा गोरे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

लक्ष्मणची आई शिवकन्या बबन नागापूरकर (वय ५३) यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून इलेक्ट्रिशियनचे काम करत होता. त्याच्या पश्चात आई, दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Parbhani News
झाडाला लटकलेल्या अवस्थेत अनोळखी महिला-पुरुषाचे कुजलेले मृतदेह सापडले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news