Parbhani News : खळी फाटा येथे पाच तास रास्ता रोको आंदोलन

ऊस उत्पादकांना पहिला हप्ता 3 हजार द्या; जिल्हाधिकाऱ्यांसमोर चर्चेचे आश्वासन
Khali Phata road blockade protest
गंगाखेड : रास्ता रोको आंदोलनात मार्गदर्शन करताना डॉ.सुभाष कदम. यावेळी शेतकरी.pudhari photo
Published on
Updated on

गंगाखेड ः तालुक्यातील जी-7 साखर कारखाना तसेच परभणी तालुक्यातील लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन किमान 3 हजार रुपये पहिला हप्ता तात्काळ द्यावा व ऊसाला 4 हजार रुपये प्रति टन दर मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.15) खळी फाटा येथे तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत सुरू असलेल्या आंदोलनामुळे गंगाखेड-परभणी मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

उसाला योग्य दर न मिळाल्याने व वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे ऊस दराबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. यापूर्वीच ऊसाला 4 हजार रुपये प्रति टन दर देण्यात यावा व पहिला हप्ता 3 हजार रुपये द्यावा, अन्यथा दि.15 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन छेडले. खळी फाटा येथे शेतकऱ्यांनी ठिय्या मांडत एफआरपी वाढविण्याची मागणी केली. घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता.

Khali Phata road blockade protest
Hingoli News : बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून हालचाली

आंदोलनात माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, भाजपचे माजी जि.प.सदस्य डॉ.सुभाष कदम, श्रीकांत भोसले, राजन क्षीरसागर, ओंकार पवार, राजेश फड, रिपब्लिकन सेनेचे प्रदेश संघटक यशवंत भालेराव, शेतकरी संघटनेचे बंडू सोळंके, अजय बुरांडे, सुरेश विखे, गोपीनाथ भोसले, कृष्णा भोसले, राजेभाऊ कदम यांच्यासह परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

Khali Phata road blockade protest
Maternal child nutrition scheme : माता-बाल संगोपन कार्यक्रमात नांदेड ‌‘टॉप फाईव्ह‌’मध्ये

रास्ता रोको आंदोलनामुळे गंगाखेड-परभणी मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचा फटका प्रवासी व मालवाहतूक वाहनांना बसला. काही वाहतूक सुनेगाव-मुळी-धारखेड या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. शिष्टमंडळाला कारखाना प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news