आमदार बाबाजानींच्या पुढाकारातून पंढरपुरात सभामंडपाचे लोकार्पण

स्थानिक विकास निधीतून सभा मंडपाची उभारणी
Inauguration of the auditorium in Pandharpur
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. Pudhari News Network

परभणी : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या २५ लाख निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचे लोकार्पण आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर आज (दि.१७) करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्‍त करताना पंढरीत उभारण्यात आलेल्या या सभामंडपाने आपल्याला आत्मीय समाधान मिळाल्याची भावना आमदार दुर्राणी यांनी व्यक्‍त केली.

Inauguration of the auditorium in Pandharpur
परभणी : अपहरण केलेल्या तरूणाची पोलिसांकडून सुटका

संत, महंत व मान्यवरांची उपस्थिती

बार्शी रोडवर आदीव विसावा येथील श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज वारकरी संस्थेत झालेल्या या लोकार्पण सोहळ्यास संत, महंत व मान्यवरांची उपस्थिती होती. चारठाणा येथील वारकरी शिक्षण संस्थेचे नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांनी या सभा मंडपासाठी विशेष परिश्रम देवून शुभाशिर्वाद दिले. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे शांतीब्रम्ह मारोती महाराज कुर्‍हेकर (आळंदी), बापुसाहेब महाराज मोरे (श्रीक्षेत्र देहू), ज्ञानेश्‍वर महाराज कदम (मोठे माऊली) या संतांसह देगाव पंढरपुरचे सरपंच समाधान घाडगे, माजी सरपंच संजय घाडगे, परभणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नानासाहेब राऊत, कंत्राटदार राजेंद्र दुबल यांच्यासह संत ज्ञानेश्‍वर महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थ तसेच श्रीक्षेत्र चारठाणा येथील सदस्य उपस्थित होते.

Inauguration of the auditorium in Pandharpur
परभणी : ईकेवायसी करुनही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना

आ. बाबाजानी यांनी घेतला फुगडीचा आनंद

विठुनामाच्या गजरात झालेल्या या सोहळ्यात टाळ-मृदंगाच्या गजरात व भजनाच्या तालावर आ. बाबाजानी यांनी फुगडीचा आनंद घेतला. सभा मंडपाचे लोकार्पण हा मनस्वी आनंदाचा सोहळा आहे. पुढील आषाढी वारीपर्यंत याठिकाणी राहिलेले काम सुध्दा पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आ. बाबाजानी म्हणाले. पांडुरंगाच्या पंढरीत आनंददायी वातावरणात हा सुखद सोहळा अनुभवता आला हे आपल्यासाठी आत्मीय समाधान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्‍त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news