परभणी : अपहरण केलेल्या तरूणाची पोलिसांकडून सुटका

३ लाखाच्या खंडणीसाठी बार्शीतील जंगलात तरूणाला डांबले
Parbhani crime News
अपहरण झालेल्या तरूणाची पोलिसांनी सुटका केली

परभणी : ३ लाखाच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण करून त्याला नांदणी गावातील वनखात्याच्या जंगलात डांबून ठेवण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा छडा लावत परभणी पोलिसांनी अपहरण झालेल्या तरूणाची सोमवारी (दि.१५) सुटका केली.

Parbhani crime News
यवतमाळ : गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

याबाबत अधिक माहिती अशी, सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथील गणपत सखाराम राठोड (वय ६५) यांचा मुलगा संजय राठोड (वय ३०) हा ५ जुलैला सायंकाळी पावणेआठच्या सुमारास मोटार सायकलवरून सोनपेठवरून कान्हेगावकडे जात असताना सोनपेठ शहराच्या बाहेर शेळगाव रस्त्यावर लक्ष्मण पवार, मारोती पवार, रामु चव्हाण यांच्यासह अन्य तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी त्याल अडविले. मोटारसायकलवरून खाली उतरवित त्याला मारहाण केली. व कारमध्ये टाकून अज्ञातस्थळी नेले होते. याबाबत संजयचे वडील गणपत राठोड यांनी दि.6 जुलै रोजी सोनपेठ पोलिस ठाण्यात या आशयाची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. फौजदार राजीव म्हात्रे अधिक तपास करीत होते.

Parbhani crime News
सांगोला : किरकोळ कारणावरून तरूणाचा कोयत्याने खून; तिघांना अटक

याच दरम्यान अपहरण करणार्‍या टोळीने संजयच्या नातेवाईकांकडे ३ लाख रूपयांच्या खंडणीची फोनद्वारे मागणी सुरू केली होती. सातत्याने फोनद्वारे धमक्या दिल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्‍लेषणाच्या मदतीने व गोपनिय माहितीच्या आधारे माहिती मिळविली. संजय राठोड याला बार्शी तालुक्यातील नांदणी गावातील वनखात्याच्या घनदाट जंगलात डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, पोलिस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनखाली फौजदार राजीव मात्रे व पोलिस नाईक भगवान मुंडे यांनी नांदणी गावातील जंगल गाठले. तेथे पोचल्यानंतर आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिस कर्मचार्‍यांनी त्यांचा पाठलाग करून संजय राठोडला ताब्यात घेतले. या शोध मोहिमेत तांत्रिक विश्‍लेषक पोलिस नाईक गणेश कोटकर, फौजदार राजीव मात्रे, भगवान मुंडे यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news