El nino Effect On Siberian Birds: सायबेरियन पक्षांनी फिरवली पाठ... अल निनोचा फटका सेलूचे पाणवठे कोरडे ठाक

El nino Effect On Siberian Birds
El nino Effect On Siberian Birdspudhari
Published on: 
Updated on: 

El nino Effect On Siberian Birds:

सेलू

अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने पाठ फिरवल्याने यंदा तालुक्यातील नद्या, नाले, पाणवठे, पाझर तलाव कोरडेठाक पडले असून त्याचा परिणाम वन्यजीवांबरोबरच दरवर्षी विदेशातून स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांवर होणार आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला चीन, मंगोलिया, सायबेरिया, रशियासारख्या अतिथंड प्रदेशातून अन्न व अनुकूल हवामानाच्या शोधात अनेक प्रजातीचे पक्षी हजारो किमीचा प्रवास करून भारतात स्थलांतर करतात.

El nino Effect On Siberian Birds
El Nino Forecast: अल निनोचा प्रभाव वाढणार; महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

दूधना नदीपात्रात हजेरी

सेलू तालुक्यात दूधना मध्यम लघु प्रकल्प, हदगाव-पावडे येथील तलाव, दूधना नदीपात्र परिसरात दरवर्षी प्रामुख्याने हजेरी लावणाऱ्या पक्ष्यांमध्ये पट्टेरी राजहंस, चक्रवाक, तलवार बदक, थापट्या बदक, गुलाबी मैना, पिवळा धोबी आदींचा समावेश आहे. तर रंगीत करकोचा, चमचा, शेकाट्या, सामान्य टिटवी, उघड्या चोचीचा करकोचा हे स्थानिक स्थलांतर करणारे महत्त्वाचे पक्षी आहेत.

मोरेगावपासून दूधना नदीचे वाहणारे पात्र हे उथळ आहे. यामुळे पाणपक्ष्यांना येथे चांगली मेजवानी मिळते. पाण्यात घोंगलफोड्या, रंगीत करकोचा, चक्रवाक बदक, छोटा पाणकावळा, टिटवी, पांढरा बगळा, चमचा, हळदीकुंकू बदक, काळ्या डोक्याचा शराटी, खंड्या, शेकाट्या आदी पक्ष्यांचा अधिवास आढळतो.

El nino Effect On Siberian Birds
El Nino impact | ‘अल निनो’मुळे समुद्रातील माशांची ‘अन्नसाखळी’ संकटात

अल निनोचा मोठा प्रभाव

यावर्षी अल निनोचा मोठा प्रभाव असल्याने सुरुवातीचा तुरळक पाऊस वगळता परिसरातील नदी, नाले, तलाव भरून वाहतील असा एकही पाऊस झाला नसल्याने ऑक्टोबर महिन्यातच नदी, नाले, तलाव, पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. वन्यजीवावर याचा विपरीत परिणाम आत्तापासून जाणवत असून पाण्याच्या शोधात वन्यप्राणी भटकंती करताना दिसत आहेत.

पावसाचा परिणाम स्थलांतर करून येणाऱ्या परदेशी पक्ष्यांवर देखील होणार असून अनुकूल हवामान व अन्न उपलब्ध होणार नसल्याने परिसरात दिसणारे स्थलांतरित पक्षी यावर्षी दिसतील की नाही, याबाबत पक्षीप्रेमींमध्ये शंका व्यक्त होत आहे.

El nino Effect On Siberian Birds
WHO El Nino health risk: 'एल निनोमुळे भारताला आरोग्याचा मोठा धोका': डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले, WHO चा गंभीर इशारा

घोंगलफोड्यांची जत्रा

मागील वर्षी दूधना नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर मुबलक अन्न मिळाल्याने घोंगलफोडे, रंगीत करकोचांनी चांगलीच गर्दी केली होती. यावर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच नदीचे पात्र कोरडेठाक पडल्याने हे पक्षी परिसरात दिसणार नाहीत. अशी प्रतिक्रिया पक्षीप्रेमी माधव गव्हाणे यांनी दिली.

पक्षीप्रेमी विजय ढाकणे म्हणाले की, 'यावर्षी परिसरातील नद्या, तलाव कोरडे असल्याने स्थलांतरित पक्षी दिसण्याची शक्यता नगण्य आहे. मात्र आपल्या रोजच्या सहवासातील पक्ष्यांसाठी नागरिकांनी आत्तापासून घर, अंगणाच्या परिसरात पाण्याची व्यवस्था करावी.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news