पूर्णा : देगावात घरफोडी, चोरट्यांनी केला ७० हजाराचा ऐवज लंपास!

सततच्या घरफोडीने पूर्णा पोलीस हैराण
Burglary in  Degaon
देगावात घरफोडी करून चोरट्यांनी ७० हजाराचा ऐवज लंपास केला.Pudhari File Photo

पूर्णा : तालूक्यातील देगाव (ईंगोले) येथील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत घरातील लोखंडी पेटी, सुटकेश मधील ७० हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली असल्याची माहिती आता उजेडात आली आहे. सदर घटनेची तक्रार बालाजी मारोतराव सुर्यवंशी यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Burglary in  Degaon
धुळे : भोरखेडा येथे 'पुष्पा स्टाईल'ने चंदनाची चोरी

या बाबत अधिक माहिती असी की, पूर्णा तालूक्यातील देगाव‌ (ईंगोले) येथील बालाजी मारोतराव सुर्यवंशी (वय ३०) हे त्यांच्या घराचे बांधकाम चालू असल्याने ते आई वडिलासह चुलते गणेश ग्यानोजी सुर्यवंशी यांच्या घरात राहतात .२४ जुलै २०२४ रोजी रात्री ११ वाजता सर्वजण जेवण करुन राहत असलेल्या चुलत्याच्या घराला कुलूप लावून बांधकाम चालू असलेल्या घरात जावून झोपी गेले. त्यानंतर रात्री ११:५५ वाजता फिर्यादीस शेजारच्या दगडोजी भोरे यांचा फोन आला की घराचा दरवाजा कोणीतरी वाजवत आहे. आणि त्यांना चोराचा संशय असल्याचे कळवले. यानंतर बालाजी व भोरे यांनी जावून पाहीले असता भोरे यांचे घर फोडून चोरट्यांनी सामान कपडे अस्तव्यवस्त फेकून दिल्याचे दिसले. चोरट्यांनी सामान विचकून फेकून दिले व लोखंडी पेटी सुटकेश मात्र उचलून बाहेर नेवून फोडून त्यातील सोन्याचे दागीने व नगदी रुपये चोरुन चोरांनी पोबारा केल्याचे समजले. तसेच गावातील डिगांबर जोगदंड यांचेही घर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी करुन धिंगाणा घातला. या चोरीमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पूर्णा शहर व ग्रामीण भागातील गावात सातत्याने चोरीच्या घटनेत वाढ आहे. यामुळे पूर्णा पोलिस मात्र हैराण होत आहेत.

Burglary in  Degaon
कविवर्य नारायण सुर्वेंच्‍या घरात चोरी, चोरट्याला झाली उपरती..!

७० हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

अज्ञात चोरट्यांनी बालाजी सुर्यवंशी यांच्या घरातील सुटकेश मधील ८ ग्राम सोन्याच्या मण्याची पोत, ३ ग्राम सोन्याची सेवनपीस, ३ ग्राम सोन्याचे झुंबर व नगदी १० हजार रुपये काढून घेत सुमारे ७० हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची समजते. ही घटना दोन दिवसापूर्वी घडली असल्याची माहिती आता उजेडात आली आहे. दरम्यान, चोरीची घटना घडली त्याच रात्री ११२ या पोलिस मदत नंबरला फोन लावल्यानंतर पोउनि केंद्रे व घोळवे तात्काळ येवून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सदर घटनेची तक्रार बालाजी मारोतराव सुर्यवंशी यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात दिल्यावरुन अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आसून याच रात्री दुसऱ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरे फोडण्याचा प्रयत्न केला होता.

Burglary in  Degaon
डफळापुरात ज्वेलर्समध्ये चोरी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news