धुळे : भोरखेडा येथे 'पुष्पा स्टाईल'ने चंदनाची चोरी

थाळनेर येथे शेतातील चोरट्यांनी पळवली चंदनाची 14 झाडे
Thieves stole 14 sandalwood trees from the farm in Thalner
थाळनेर येथे शेतातील चोरट्यांनी पळवली चंदनाची 14 झाडेPudhari File photo

धुळे, पुढारी वत्तसेवा : शिरपूर तालुक्यातील थाळनेर शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने चंदनाची 14 झाडे लंपास केली. ही घटना बुधवारी (दि.17) घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चंदनाची किंमत 98 हजार रूपये इतकी लावण्यात आली आहे. गावामध्ये या पुष्पा स्टाईल चोरीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

Thieves stole 14 sandalwood trees from the farm in Thalner
बेल्हे : राजुरी शिवारात चंदन चोरी

शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील भरतसिंग लोटनसिंग राजपुत यांनी त्यांच्या थाळनेर गाव शिवारातील शेतात चंदनाची झाडे लावली होती. ही झाडे 12 वर्षाची झालेली होती. मात्र बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने शेतात प्रवेश करून चंदनाची एकुण 14 झाडे तोडुन लंपास केली. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाणे गाठून या संदर्भातील तक्रार दिली. चोरट्यांनी इतर झाडांना करवतीने कट मारून नुकसान केले होते. याबाबत थाळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news