झिरोफाटा, भारती कॅम्प येथे श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन

मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन
Shri Gajanan Maharaj Palkhi
झिरोफाटा, भारती कॅम्प येथे श्री गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.Pudhari News Network

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: शेगाव येथून प्रस्थान ठेवलेल्या श्री. गजानन महाराज यांच्या पालखीचे आज (दि. २६) दुपारी १ च्या दरम्यान झिरोफाटा, भारती कॅम्प (ता.पूर्णा) येथे आगमन झाले. यावेळी पालखीला विसावा देण्यात आला. दिंडीचे स्वागत व पूजन करण्यात आल्यानंतर परिसरातील भाविकांनी पालखीचे स्वागत करुन श्रींचे दर्शन घेतले.

Shri Gajanan Maharaj Palkhi
परभणी -ताडकळस ते महातपुरी शिवरस्ता खुला करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर दगडफेक

मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन

सिद्धेश्वर संस्थानचे महंत शिवानंद महाराज, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, संजय कुमार लोहिया, राजकुमार लोहीया, रितेश काळे, पिंटू काळे यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले.

Shri Gajanan Maharaj Palkhi
परभणी: पूर्णा तालुक्यात खरीप पेरणीस सुरुवात: मोठ्या पावसाची प्रतीक्षा

एरंडेश्वर, भारती कॅम्प, नांदगाव परिसरात भाविकांची गर्दी

आषाढी एकादशीच्या सोहळ्या‌त सहभागी होण्यासाठी शेगाव येथून पंढरपूरकडे श्री गजानन महाराज यांची पालखी मार्गस्थ झाली आहे. झिरोफाटा येथे आगमन झाल्यानंतर पालखीचे एरंडेश्वर, भारतीकॅम्प, नांदगाव परिसरात भाविकांनी श्रींचे भक्तीभावे जल्लोषात स्वागत करुन आशीर्वाद घेतले.

७०० वारकऱ्यांसह पालखीसोबत मोठा लवाजमा

श्री गजानन महाराज यांचा भव्य दिव्य पालखी सोहळा आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो. यंदा देखील 'श्रीं' चा ५५ वा पालखी सोहळा दिंडीसह मार्गस्थ झाला आहे. पालखीसोबत ७०० वारकरी भाविक, भक्त, ४ अश्व, ९ वाहने, २ रुग्णवाहिका, डॉक्टर, सेवेकरी असा मोठा लवाजमा आहे.

Shri Gajanan Maharaj Palkhi
परभणी : सेलू तालुक्यातील ३ गावे ३ महिन्यांपासून अंधारात

पोलिसांकडून चोख बंदोबस्त

माणिकराव भालेराव, सचिन कदम, गजानन हिवरे, ओमप्रकाश काळे, मुंजाजी पिसाळ, रामप्रसाद काळे, विनायक यादव, पूर्णा ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सहायक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश ईंगोले, मनोज नळगिरकर, समाधान पाटील आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news