सेलू; पुढारी वृत्तसेवा : महवितरणने सेलू तालुक्यातील रायपूर, हातनूर, साळेगाव येथील गावठाण डी. पी. बंद केल्याने तब्बल तीन महिन्यांपासून ही गावे अंधारात आहेत. विद्युत पुरवठा सुरू करण्याची विनंती करूनही महावितरणकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा त्वरीत सुरळीत करावा अन्यथा आंदोल करू, असा इशारा रायपूर येथील सचिन गाडेकर यांनी दिला आहे.
महावितरणने विद्युत पुरवठा खंडीत केल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी असुनही मिळत नाही. जनावरांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात विजेअभावी पाण्यासाठी हाल होत आहेत. विद्युत पुरवठा लवकर सुरू न झाल्यास महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा रायपूर येथील सचिन गाडेकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन परभणी येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना बुधवारी (दि. २९) देण्यात आले आहे.
हेही वाचा :