जयंत पाटलांची डिनर डिप्लोमसी आणि बाबाजानींच्या हाती पुन्हा तुतारी

परभणीत शरद पवारांचा अजितदादांना शह | Babajani Durrani rejoins Sharad Pawar
durrani rejoins sharad pawar
राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाबाजानी दुर्राणी यांच्या घरी शुक्रवारी भोजन घेतले आणि त्यांच्याशी चर्चा केली.

परभणी : Babajani Durrani rejoins Sharad Pawar - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. दुर्राणी यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत शनिवारी प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली.

विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने गेल्या दुर्राणी अजित पवारांवर नाराज होते. दुर्राणी यांच्या प्रवेशामुळे शरद पवार यांना परभणीत दिग्गज नेता मिळाल आहे.

शरद पवारांचे निष्ठावंत

babajani durrani to rejoin sharad pawar faction
छत्रपती संभाजीनगर येथे बाबाजानी दुर्राणी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली

गेल्या ४० वर्षांपासून दुर्राणी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली परभणीत कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन बांधण्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरील पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचे काम केले. पाथरी नगरपालिकेवर गेली २० वर्षांपासून एकहाती सत्ता गाजवली. २००४च्या तत्कालीन सिंगणापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेत प्रथम प्रवेश केला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी, हिंगोली मतदारसंघातून त्यांनी २०१२ ते २०१७मध्ये विधान परिषदेत प्रतिनिधीत्व केले. (Babajani Durrani rejoins Sharad Pawar)

मात्र २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या आघाडीतून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने संपूर्ण तयारीत असलेल्या बाबाजानी यांना ज्येष्ठ नेते पवार यांच्या आदेशावरून उमेदवारी मागे घेतली होती. तर पुढे काही महिन्यांतच शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. याचा कालावधी नुकताच मागील महिन्यात संपला. मात्र या दरम्यान वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडून अजित पवार गट वेगळा झाल्याने बाबाजानी यांची मोठी कोंडी झाली होती. विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीसाठी अजितदादांच्या गटात राहून त्यांनी उमेदवारी मिळविण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला.

durrani rejoins sharad pawar
Jayant Patil : भाजपकडून आता गुद्द्याची भाषा... शरद पवार गटाचे पाटील यांचा टोला

अजित पवारांना साथ आणि माघार |Babajani Durrani rejoins Sharad Pawar

पवार काका-पुतण्याच्या झालेल्या या विभाजनातही शरद पवारांचे नेतृत्व मान्य करीत त्यांच्याच पाठीशी राहण्याचा निर्णय दुर्राणी यांनी घेतला होता. मात्र राजकीय समीकरणं आणि विकास कामांच्या निधी वाटपात त्यांची कोंडी झाली. त्यामुळे त्यांनी काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.

परंतु महायुतीतील पाथरी विधानसभा मतदारसंघातील काही नेते मंडळींकडून त्यांची होत असलेली अडवणूक, राजकीय संघर्ष यामुळे दुर्राणी कमालीचे अस्वस्थ होते. शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्याशी जुळवून घेणेही त्यांना कठीण जात होते. लोकसभा निवडणुकीतही दुर्राणी राजकीय प्रक्रियेत दूरच राहिले होते. त्यामुळे ते पुन्हा शरद पवारांकडील जातील अशी अटकळ बांधली जात होती.

durrani rejoins sharad pawar
शरद पवार-शिंदे चर्चेला विधानसभेची किनार

जयंत पाटलांची डिनर डिप्लोमसी

राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील हे शुक्रवारी जिल्ह्याच्या दौर्‍यावर दाखल झाले होते. या दरम्यान दुर्राणी यांनी पाटील यांना घरी जेवणाचे आमंत्रण दिले. या निमंत्रणावर पाटील यांनी जुन्या ऋणानुबंधातूनच त्यांच्या आग्रहाखातर आपण भोजनास गेल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यांच्या प्रवेशाबाबत पाटील यांनी अधिकृतता दिली नव्हती.

पाथरी मतदारसंघात काय होणार?

पाथरी मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघातून दुर्राणी यांना महविकास आघाडीची उमेदवारी मिळावी, अन्यथा अपक्ष लढू, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदरासंघातील राजकीय समीकरणाकडे मराठवड्याचे लक्ष असणार आहे.

durrani rejoins sharad pawar
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा संघटनांची घोषणाबाजी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news