Jayant Patil : भाजपकडून आता गुद्द्याची भाषा... शरद पवार गटाचे पाटील यांचा टोला

जयंत पाटील : भाजपची विद्वत्ता संपली असून, शब्दही संपलेत
Jayant Patil : भाजपकडून आता गुद्द्याची भाषा... शरद पवार गटाचे पाटील यांचा टोला
Published on
Updated on

नाशिक : लोकसभेतील पराभव जिव्हारी लागला असून, विधानसभेतही पराभव स्पष्टपणे दिसून येत असल्याने भाजपची भाषा बदलली आहे. या नैराश्येतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठोका, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. भाजपची विद्वत्ता संपली असून, शब्दही संपलेत. त्यामुळे भाजप मुद्यावरून आता गुद्यावर आल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. (Jayant Patil - Member of the MaharashtraLegislative Assembly)

पाटील पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने खोटं नरेटिव्ह पसरवले, असा आरोप आता केला जात आहे. पण आपलेच ११ उमेदवार भाषणात संविधान बदलण्यासाठी दिल्लीत पाठवा, असा प्रचार करत होते. लोकसभेत ३७ ते ३८ जागा निवडून येणे अपेक्षित होते. पण काही मतदारसंघांत पैशांचा पूर आला. काही ठिकाणी 'पिपाणी'ने घात केला.

विधानसभेचे वारे वाहू लागल्याने विराेधक घाबरले आहेत. मतांसाठी सध्या मोठमोठ्या घोषणांची खैरात वाटप केली जात आहे. पण महायुतीला आपल्या तिजोरीत किती पैसे आहे हे कळत नाही. लाडकी बहीण योजना आणली. पण राज्यात ४२ हजार महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या, असे पाटील म्हणाले. तसेच लोकसभेपेक्षा विधानसभेत जास्त ताकदीने निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोविड काळात खटाव तालुक्यातील माैजे मयाणी येथे एका हॉस्पिटलने मृत रुग्ण जिवंत दाखवून शासनाच्या सवलतीचा लाभ घेतला. त्यात भाजपच्या एका आमदाराचा सहभाग असल्याचा आरोप पाटील यांनी केला. ससूनची अवस्था दयनीय असून, तेथे विविध घटना घडल्या असतानाही शासन त्याची दखल घेत नसल्याने ससूनचा दर्जा घसरल्याचे पाटील म्हणाले. (Jayant Patil - Member of the MaharashtraLegislative Assembly)

येत्या २० ऑक्टोबरला निवडणुका

महाराष्ट्रात साधारणत: २० ऑक्टोबरपर्यंत विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असेल. २०१९ मध्ये २३ नोव्हेंबरला अजित पवार व फडणवीस यांनी शपथ घेतली होती. त्यामुळे फार तर १५ ते २० दिवस मागे पुढे होऊ शकतात. निवडणूक आयोगावर कुणाचा दबाव नसल्यास ऑक्टोबरमध्ये निवडणूक लागेल, असा दावा पाटील यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news