परभणी : पूर्णेत मराठा समाजाचे सरकारविरूद्ध बोंब मारो आंदोलन

परभणी : पूर्णेत मराठा समाजाचे सरकारविरूद्ध बोंब मारो आंदोलन

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ पूर्णा शहरात आज (दि. १३) सकल मराठा समाजाच्या वतीने अर्धनग्न होत बोंब मारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहेत. त्यांची तब्येत खालावत असताना सरकार सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत नाही. मराठा समाजाचे आंदोलन सरकार गांभीर्याने घेत नाही. मराठा आणि कुणबी एकच असताना ५७ लाख नोंदी मिळूनही सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न करता मराठा समाजाला झुलवत ठेवून सरकार वेळ मारुन नेत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. अर्धनग्न बोंबमारो आंदोलनावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी मागण्यांचे निवेदन महसूल अधिकारी शिंदे यांना देण्यात आले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news