जळगाव : “चला मंदिरात पाया पडायला जाऊया”! म्हणत पत्नीने काढला पतीचा काटा

जळगाव : “चला मंदिरात पाया पडायला जाऊया”! म्हणत पत्नीने काढला पतीचा काटा

जळगाव: पुढारी वृत्तसेवा – मंदिरात दर्शन घेण्याच्या बहाण्याने दिव्यांग पतीला शेतातील विहिरीत ढकलून देत पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. भवरखेडा ता. धरणगाव येथील ही खळबळजनक घटना तब्बल दहा दिवसांनी उघडकीस आली आहे.

प्रकाश यादव धोबी (सुर्यवंशी) (वय ३६, रा. भवरखेडा ता. धरणगाव), असे मृत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी अर्जुन शिवाजी धोबी (रा.भवरखेडा) यांनी फिर्याद दिली. रविवार (दि.२) रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश धोबी हिने पती प्रकाश यास तिच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाच्या मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने पतीला नेले.

त्यानंतर पतीचा दिव्यांगत्वाचा फायदा घेवून त्याला विहिरीत ढकलून दिले. ही घटना बुधवार (दि.१२) रोजी उघडकीस आली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news