जुगार अड्यांवर कारवाई, दोन दिवसांत सलग गुन्हे नोंद

शहरासह परिसरात अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करत सलग ५ गुन्हे दाखल केले.
Nanded Crime
Nanded Crimepudhari photo
Published on
Updated on

Action taken against gambling dens, consecutive crimes registered in two days

मानवत, पुढारी वृत्तसेवा : शहरासह परिसरात अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करत सलग ५ गुन्हे दाखल केले. दि. २८ व ३० मार्च रोजी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत अनेकांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.

Nanded Crime
Biloli illegal gambling : बिलोलीत पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत एकूण ५ स्वतंत्र गुन्हे नोंद झाले. आठवडी बाजार परिसरात दि.२८ मार्चला पहिली कारवाई करत जुगार खेळताना आरोपींना पकडले. यात रोख रक्कम जप्त केली. याच दिवशी बसस्थानकनजीक सार्वजनिक रस्त्यावरही कारवाई झाली. येथेही जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत रोख रक्कम जप्त केली.

सायंकाळी उशिरा पुन्हा आठवडे बाजारात धाड टाकून जुगार अड्ड्यावर कारवाई केली. यातही आरोपींकडून रोख रक्कम व साहित्य हस्तगत केले. तालुक्यातील लोहरा येथील कालव्याजवळ सार्वजनिक रस्त्यावरील जुगारावर छापा टाकून आरोपींवर गुन्हा दाखल केला.

Nanded Crime
Jalna MIDC gambling raid : सोरट खेळविणारा पोलिसांच्या जाळ्यात

सोमवारी (दि.३०) सायंकाळी सेलू कॉर्नर मानवत रोड येथील साक्षी पानपट्टीजवळील रस्त्यावर पोलिसांनी कारवाई करून आणखी एक गुन्हा नोंदवला. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी अवैध जुगारा विरोधात मोहीम हाती घेतली असून शहरासह ग्रामीण भागात सातत्याने कारवाई सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला. सलग कारवाईमुळे परिसरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा दबदबा वाढला असून, अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू रा-हणार असल्याचे संकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news