Biloli illegal gambling : बिलोलीत पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

दोन लाखांच्या मुद्देमालासह 5 जण जेरबंद
Biloli illegal gambling
बिलोलीत पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापाFile Photo
Published on
Updated on

बिलोली ः बिलोली तालुक्यातील नजीकच्या बामणी शिवारात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर बिलोली पोलिसांनी शुक्रवारी दि. 13 पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी रोख रकमेसह तीन मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण 2 लाख 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन सहा आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बामणी शिवार परिसरात काही इसम बेकायदेशीररीत्या जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक अतुल भोसले यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे 3:50 च्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला.

Biloli illegal gambling
Nanded Muncipal Corporation : भाजपच्या अजब करामतीमुळे नांदेडमध्ये सस्पेन्स वाढला!

पोलिसांनी घटनास्थळावरून 5 आरोपींना रंगेहाथ पकडले, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम: 33,250 रुपये तीन मोटार सायकली 4 महागडे मोबाईल संच असा एकुन 2 लाख 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी योगेश नागोराव वडपत्रे (रा. सायखेड), शिवराज नागनाथ दुडले (रा. आरळी), गुंडप्पा इरप्पा चौगुले (रा. धावरी तांडा), शेख पिर अहमद घुडुमिया (रा. मंगनाळी) आणि सुनील बाबुराव वाघमारे (रा. रविंद्र नगर, बिलोली) यांना अटक केली आहे. तर शेख सुलेमान शेख बाबु रा. भास्कर नगर, बिलोली हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Biloli illegal gambling
Chaff cutter machine accident : कुट्टी मशीनचा भोंगा तुटून शेतकऱ्याचा मृत्यू

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल भोसले, फौजदार तिडके, पोलीस कर्मचारी शेख, अंबुरे आणि धुपटवाड यांच्या पथकाने केली.

आता फिरता जुगार

यातील काहींनी फिरता जुगार अड्डा चालवण्याची नवीन सिस्टम कार्यरत केली आहे . बिलोली तालुक्यातील येसगी, सगरोळी, कुंडलवाडी, अर्जापूर,सावळी, आरळी, बामणीसह तालुक्यातील बहुतांश ठिकाणी फिरता जुगार अड्डा चालवून ग्राहकांना फोन वरून लोकेशन देवून जुगाऱ्यांना एकत्र करून जुगार अड्डा चालवण्याचा प्रकार चालू आहे.

स्थानिक बीट जमादारांना हाथाशी धरून हि यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे पोलिस निरीक्षकांच्याच लोकेशन ची माहिती जुगार अड्डा चालकांना सहज उपलब्ध होत आहे. पोलीसांकडूनच फितुरी होत असून परिणामी जुगार अड्डा चालकांचे मनोधैर्य यामाध्यमातून वाढले असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news