Jalna MIDC gambling raid : सोरट खेळविणारा पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी परिसरात पोलिसांची कारवाई
Jalna MIDC gambling raid
Jalna MIDC gambling raidpudhari photo
Published on
Updated on

जालना ः शहरातील एमआयडीसी परिसरात सोरट नावाचा जुगार खेळवून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणाऱ्या एका व्यक्तीवर चंदनझिरा पोलिसांनी शुक्रवार, दि. 27 रोजी दुपारच्या पावणे दोन वाजेच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह आरोपीला रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे सपोउपनी मनसुब वेताळ हे पथकासह गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जालना एमआयडीसी भागातील पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती बेकायदेशीरपणे सोरट जुगार खेळवत आहे.

Jalna MIDC gambling raid
Washim Crime | वाशीमजवळील पाटील ढाब्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाकेबाज छापा

या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुपारी 1.40 वाजेच्या सुमारास सापळा रचून छापा टाकला. यावेळी सतीश बाळू सकट (वय 29, रा. मातोश्री चौक, चंदनझिरा) हा लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळविताना आढळून आला.

पोलिसांनी त्याच्याकडून 830 रुपये रोख आणि सोरट जुगाराचे रंगीत साहित्य जप्त केले आहे. आरोपीविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार प्रशांत देशमुख करत आहेत.

Jalna MIDC gambling raid
Washim Crime | वाशीमजवळील पाटील ढाब्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाकेबाज छापा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news