परभणी : पूर्णा येथील लिमला परिसरात गारांचा पाऊस | पुढारी

परभणी : पूर्णा येथील लिमला परिसरात गारांचा पाऊस

पूर्णा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लिमला गाव व परिसरात आज (दि.११) सायंकाळी ५.३० च्या सुमारास मुसळधार पावसासह जोरदार गारपीट झाली. अचानक आलेल्या वादळीवा-यासह अवकाळी पाऊसाबरोबर पंधरा ते वीस मिनिटे मोठ्या गारांचा मारा झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. यामुळे शेतातील कापून टाकलेला कडबा चारा, अंबा फळबाग, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.

लिमला येथे गारांचा मोठा खच साचला होता. तर परिसरातील गाव शिवारातही अवकाळी पाऊसासह गारा पडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. गौर परिसरातही वादळी-वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button