

बीड, पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसाने बीडच्या धारूर वडवणी तालुक्याला अक्षरश: झोडपले. तालुक्यात वाऱ्यासह पाऊस झाला तर धारूर तालुक्याच्या काही भागाला गारपिटीने तडाका दिलाय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि ठिकाणी घरावरचे पत्रे देखील उडून गेले तसेच आंब्यासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा बीड जिल्ह्यात कमी पाऊस पडल्याने शेतकरी आधीच संकटात आहे, त्यात आता या अवकाळी ने तडाका दिल्याने आंब्यामधून मिळणारे उत्पन्नावर देखील पाणी फेरले गेले आहे.