परभणी : कौसडी येथील विस्तार अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सीईओ, बीडीओंना निवेदन | पुढारी

परभणी : कौसडी येथील विस्तार अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सीईओ, बीडीओंना निवेदन

कौसडी, पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायत अंतर्गत पंधरावा वित्त आयोगाच्या निधीत विस्तार अधिकारी तथा तत्कालीन प्रशासक एस. व्ही. ढोणे यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे चौकशीच्या मागणीचे निवेदन दिले आहे.

कौसडी ग्रामपंचायतचा कार्यभार सन 2021-22 मध्ये प्रशासक एस. व्ही. ढोणे यांच्याकडे होता. तर ग्राम विकास अधिकारी म्हणून बी. एस. खराबे हे होते. या दोन वर्षाच्या काळामध्ये पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून नाली बांधकाम, ढापे टाकणे, पाईपलाईन करणे, अंगणवाडी दुरुस्ती, शाळा दुरुस्ती, सिमेंट रस्ते इत्यादी कामे झाली आहेत. ती कामे अत्यंत निकृष्ट व बोगस दर्जाची करण्यात आली होती. तर काही रक्कम उपअभियंता यांना हाताशी धरून लाखो रुपये काम न करता उचलण्यात आली. व प्रशासक काळ संपल्यानंतर त्याच कामावर सध्या सरपंच व विस्तार अधिकारी ढोणे यांनी संगनमत करून पुन्हा लाखो रुपयांची बिले उचलली आहेत, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

या निवेदनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी ग्राम विकास अधिकारी, अभियंता व सरपंच यांची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर शेख अनवर पटेल व समीर खान पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा 

Back to top button