परभणी : पुनकळस पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू | पुढारी

परभणी : पुनकळस पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

ताडकळस; पुढारी वृत्तसेवा : माजलगाव ते नांदेड महामार्गावर ताडकळस जवळ असलेल्या पुनकळस पाटीजवळ सोमवारी सायंकाळी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. आकाश उर्फ बंटी सखाराम सोनवणे (वय २३, ब्राह्मणगाव, ता. परभणी) असे मृत तरूणाचे नाव आहे.

आकाश हा मोटारसायकलवरून नांदेडकडे जाताना एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची ताडकळस पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

हेही वाचा : 

Back to top button