परभणी : महिला पोलिस ५ हजाराची लाच स्विकारताना रंगेहात जाळ्यात

file photo
file photo

परभणी, पुढारी वृत्तसेवा : पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५ हजाराची लाच स्विकारताना पाथरी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस हवालदारला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. संगीता नामदेवराव वाघमारे असे या महिला पोलिसाचे नाव आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या जागेत अतिक्रमण करुन वास्तव्यास असणारे व अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून संबंधीत तक्रारदाराने उपोषण केले होते. मात्र प्रकल्पाच्या जागेवर अतिक्रमण करुन राहणार्‍यांपैकी एकाने तक्रारकर्ते यांच्यावर पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात तक्रारदार यांना त्यांच्या विरुध्दच्या दाखल गुन्ह्यात मदत करण्याकरीता महिला पोलिस हवालदार संगीता वाघमारे यांनी पैशाची मागणी केली. यावर तक्रारकर्त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. या विभागाने तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा वाघमारे यांनी तक्रारकर्ता यांना पंचासमक्ष पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हे निष्पन्न झाले. त्याआधारे पथकाने पाथरी येथील ओंकार नगर भागातील सुविधा मार्ट या मॉलमध्ये वाघमारे यांना तक्रारकर्त्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

पोलिस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, चंद्रशेखर निलपत्रेवार, सीमा चाटे, कल्याण नागरगोजे, मोहम्मद झिब्राहील व कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news