परभणी : जिंतूर तालुक्यात सोयाबीन संकटात; पिकांना विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव

परभणी : जिंतूर तालुक्यात सोयाबीन संकटात; पिकांना विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक रोग व फुजेरीयम बुरशी पडल्यामुळे शेतकर्‍यांची पिके संकटात आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून याचे तात्काळ पंचनामे व्हावे आणि नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जिंतुरचे तहसीलदार राजेश सरवदे यांच्याकडे शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्ववारे केली आहे.

निवेदनात असे नमुद केले आहे की, यावर्षी सुरवातीपासुनच निसर्गाने शेतकर्‍यावर अवकृपा केली. अल्पपावसात शेतकर्‍यांनी पेरण्या उरकल्या परंतु रोगाने थैमान घातले आहे. सध्या चारठाणा येथील शेतकर्‍याच्या सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक रोग व फुजेरीयम बुरशी पडल्यामुळे शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला आहे. या संदर्भात प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसीलदार राजेश सरवदे यांच्याकडे करण्यात आली असुन या निवेदनावर सरपंच अनिरुद्ध चव्हाण, नवनाथ तमशेटे, शिवशंकर तमशेटे, कृष्णा घाटूळ, शिवाजी घाटुळ, शुभम क्षीरसागर, गणेश शिरसागर, सुभाष पवार, अशोक देशपांडे, सचिन घाटूळ, शिवाजी वानखरे, राहूल मुजमुले, गणेश क्षीरसागर, अजित हिरप, रामभाऊ घाटूळ, सुरज क्षिरसागर, कृष्णा घाटूळ आदी शेतकर्‍यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news