परभणी : बस-ट्रकची समोरासमोर धडक; १ ठार, १२ जखमी

परभणी : बस-ट्रकची समोरासमोर धडक; १ ठार, १२ जखमी
Published on
Updated on

मानवत, पुढारी वृत्तसेवा : पुणे येथून परभणीकडे जाणार्‍या एका खासगी आरामबसला परभणीहून पाथरीकडे भरधाव जाणार्‍या ट्रकने समोरासमोर जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या बस चालकाचा खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर या अपघातात अन्य १२ प्रवाशी जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.६) सकाळी ८ च्या सुमारास पोखर्णी ते पाथरी रस्त्यावरील रामेटाकळी शिवारात घडली.

पुणे येथून मैत्री खासगी बस (एमएच १९ वाय ३२३२) प्रवासी घेऊन परभणीकडे जात होती. ही बस पाथरी ते पोखर्णी रस्त्यावरील रामेटाकळी शिवारात आल्यानंतर तिला परभणीहून पाथरीकडे जाणारा ट्रकने (जीजे ३६ व्ही ५५०९) समोरून जोराची धडक दिली.
हा अपघातात बसचा समोरील भाग चक्‍काचूर झाला. तर एकमेकांत अडकलेली बस आणि ट्रक जेसीबीच्या सहायाने वेगळे करण्यात आले. अपघाताची माहिती १०८ अ‍ॅम्बुलन्सचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. विशाल गरड यांना मिळताच त्यांनी पाथरीतील डॉ. बी. आर. अतकरे यांना दिली. यानंतर डॉ. अतकरे यांनी गंगाखेड, परभणी, रामपुरी, दैठणा, पाथरी व बाभळगाव येथील अ‍ॅम्बुलन्सला याठिकाणी पाचारण केले.

यावेळी डॉ. एम.एम.मनेरे, डॉ.शिवणीकर, चालक सुरज ढवळे, अझहर पठाण, प्रसाद ढवभळे, मुंजा यादव आदींनी घटनास्थळी दाखल होत जखमींना परभणीतील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेले. दरम्यान, या अपघातातील गंभीर जखमी बस चालक अक्रम पठाण (वय ४०, रा.परभणी) यांचा खासगी रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

कुंदनसिंग चंदासिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले. पुंडलिक देवराव नोमाले, निंबाबाई दंडवते, शुभांगी जाधव हे गंभीर जखमी असून शेख सलीम शेख चांद, ज्ञानोबा दंडवते, वैभव पाटील, सुनिल पाटील, चांदू तुकाराम धोत्रे, अंजूम सलिम शेख, इनिया सलिम शेख, महिंद्र चव्हाण हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती डॉ. संध्या डोली यांनी दिली.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, सहायक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, प्रभाकर कापुरे व अन्य कर्मचार्‍यांसह ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना मदतकार्य सुरू केले होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news