पैठण : विहामांडवा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; मारहाणीत महिला जखमी

चोरट्याचा धुमाकूळ
चोरट्याचा धुमाकूळ

पैठण; पुढारी वृत्तसेवा पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे काल (शुक्रवार) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून एका महिलेला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, पैठण विहामांडवा येथे शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घरात इंदिरानगर येथे सविता गौतम बनसोडे या झोपल्‍या होत्‍या. यावेळी अज्ञात चोरट्याने या परिसरात धुमाकूळ घालून सविता गौतम बनसोडे या महिलेला जबरी मारहाण करून नाकातील कानातील किमती सोन्याचे ऐवज ओरबडून घेतले. यावेळी चोरट्यांच्या झटापटीत सदरील महिलेच्या तोंडाला जबरी जखम झाल्याने त्‍यांना तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या चोरट्याने या परिसरात अन्य दोन घरांमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पैठण विभागाचे डीवायएसपी डॉ विशाल नेहुल, सपोनि संतोष माने, विहामांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोना अभिजीत सोनवणे, सुधाकर चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news