उस्मानाबाद: तिसऱ्या माळेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात नेत्रदीपक फुलांची सजावट

उस्मानाबाद: तिसऱ्या माळेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात नेत्रदीपक फुलांची सजावट
Published on
Updated on

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेच्या निमित्ताने पुणे येथील तुळजाभवानीचे भक्त प्रवेश कैलास पेटकर यांनी तुळजाभवानी मंदिर परिसरात नेत्रदीपक फुलांची सजावट केली. दरम्यान, हजारो भाविक भक्तांनी तुडुंब भरलेले दर्शन मंडप अशी वैशिष्ट्ये पाहावयास मिळाली. रात्री उशिरापासून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम होती. सायंकाळी साडेनऊ नंतर ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली.

दर्शन मंडपाचे चारही मजले भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरलेले दिसून आले. "आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो", अशा जयघोषात ग्रामीण भागांमधून आलेल्या भाविक भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता . भवानी मातेच्या दर्शनाची आस या भाविकांना लागलेली स्पष्टपणे जाणवत होती . श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश कैलास पेठकर (रा. पुणे) यांनी नवरात्रौत्सवानिमित्त श्रीदेवीच्या गाभाऱ्यात व मंदिर परिसरात आकर्षक, उत्कृष्ट अशी सजावट केली आहे. फुलांची सजावट करण्यासाठी पुणे येथील ३० कुशल कलाकार आणले होते. पेटकर परिवार यांनी तुळजाभवानी देवीची श्रद्धा पूर्वक ही फुलांची सजावट केल्याचे सांगण्यात आले. मंदिर संस्थांच्या वतीने या परिवाराचा सत्कार करण्यात आला.

यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबाचा मंदिर संस्थानच्या वतीने व्यवस्थापक प्रशासन योगिता कोल्हे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी, फोटो, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक व्यवस्थापक धार्मिक विश्वास कदम, सहायक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे मंदिर कर्मचारी, गणेश नाईकवाडी, संकेत वाघे व सुरक्षा रक्षक आदी उपस्थित होते. तुळजाभवानी देवीचा गाभारा, सिंह गाभारा, भवानी शंकर परिसर, यमाई आणि इतर उपदेवतांची मंदिरे, ओवरी होमकुंड, निंबाळकर दरवाजा, राजे शहाजी महाद्वार, राजमाता जिजाऊ महाद्वार, गोमुखतीर्थ अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही फुलांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news