Nanded News | दुचाकीसह बेपत्ता तरुणाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला

गोकुंदा येथून दोन महिन्यांपूर्वी तरुण होता बेपत्ता
Gokunda  missing youth found dead
गोकुंदा येथून दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. Pudhari Photo
Published on
Updated on

Nanded Gokunda missing youth found dead

किनवट : गोकुंदा येथून दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सडलेल्या अवस्थेत सापडला. रविवारी (दि. २७) सकाळी किनवट–राजगड राष्ट्रीय महामार्गालगत खोदलेल्या नालीमध्ये दुचाकीसह पडलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आला. मृत तरुणाचे नाव सचिन गंगाधर आरपेल्लीवार (वय २०) असे आहे.

सचिन हा २७ फेब्रुवारी रोजी सकाळी कामासाठी घरातून बाहेर पडला होता. परंतु तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी व पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. याच दरम्यान, रविवारी सकाळी महामार्गालगत शेतात नांगरणी करताना ट्रॅक्टर चालकाच्या नजरेस रस्त्याच्या कडेला नालीत एक दुचाकीसह पडलेली व्यक्ती आढळली. त्याने तातडीने किनवट पोलीस ठाण्यात ही माहिती दिली.

बीट जमादार संग्राम मुंडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करताना एमएच २९ बीएस ८६०६ क्रमांकाची मोटारसायकल व त्याच्या खाली सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मिळालेल्या ‘मिसिंग’ नोंदीनुसार व कपडे व मोबाईलवरून मृताची ओळख पटवली. नातेवाईकांच्या पुष्टीने मृत व्यक्ती सचिन आरपेल्लीवार असल्याचे निश्चित झाले.

शवविच्छेदन करून मृतदेह वडील गंगाधर भूमन्ना आरपेल्लीवार यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अपघात झाला की अन्य कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला. याचा तपास किनवट पोलीस करत आहेत. पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संग्राम मुंडे पुढील तपास करीत आहेत.

Gokunda  missing youth found dead
नांदेड-पूर्णा रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news