Nanded Railway : वर्धा, नांदेड रेल्वे मार्ग ! लांब 'टनेल' ठरतोय आकर्षण!

पुसद टप्प्यातील काम प्रगतीपथावर!
Nanded Railway
Nanded Railway : वर्धा, नांदेड रेल्वे मार्ग ! लांब 'टनेल' ठरतोय आकर्षण!file photo
Published on
Updated on

Wardha-Nanded Railway Line: The Longest Tunnel Emerges as a Major Attraction!

प्रशांत भागवत

उमरखेड : पुढारी वृत्तसेवा वर्धा, यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे पुसद, उमरखेड टप्प्यातील काम प्रगतिपथावर आहे. पुसद, उमरखेड मार्गावरील डोंगर नद्या व जंगलाने वेढलेल्या तालुक्यातील गगनमाळ घाटात खोदलेला सर्वाधिक लांब बोगदा रेल्वेप्रेमींचे आकर्षण ठरत आहे. एकूण २.७ किलोमीटर लांबीचा हा एकमेव भव्य दिव्य, 'टनेल' उंच भागावरील पाणी वाहून जाण्यासाठी 'ड्रेन अँड ट्रेन' पद्धतीने साकारण्यात येत आहे.

Nanded Railway
Naam Foundation | 'नाम फाऊंडेशन' करणार दहिबांव नदीतील गाळ उपसा

डोंगर घाटातून प्रवास करणारी ही रेल्वे कशी धावणार? याबद्दल नागरिकांमध्ये मोठे औत्सुक्य आहे. विशेष म्हणजे वर्धा-नांदेड या संपूर्ण रेल्वे मार्गावर डोंगर झाडीतील पुसद व उमरखेड परिसरातच पाच 'टनेल्स' अर्थात बोगदे तयार करण्यात आले आहे. त्यापैकी तिसरा ३७० मीटर लांबीचा टनेल हर्षी- भागात असून त्याचे लायनिंगचे काम सुरू आहे.

चौथा टनेल ४४० मीटर लांबीचा बाळवाडी येथे असून त्याचेही लायनिंगचे काम प्रगतिपथावर आहे. याच भागातील पाचवा टनेल गगनमाळ घाट परिसरात असून या टनेलचा 'ब्रेक थ्रू' नुकताच झाला असून लायनिंगचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या सर्वाधिक लांबीच्या टनेलची पाहणी केली असता बोगद्यामध्ये पाणी साचून आहे.

Nanded Railway
Devendra Fadnavis | मिसिंग लिंक नव्हे, महाराष्ट्राची कनेक्टींग लिंक; या मार्गाची नोंद 'गिनिज बुक' मध्ये : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष म्हणजे मुळाव्यापासून वरून खालपर्यंत येणारे पाणी या बोगद्यातून वाहणार आहे. त्यासाठी रेल्वे पटरी खाली पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज सिस्टिम करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे 'ट्रेन विथ ड्रेनेज' असलेले हे एकमेव टनेल आहे. पाइपलाइन ऐवजी नाल्यांची बांधणी दोन्ही बाजूने करण्यात येणार असल्याची माहिती प्रोजेक्ट इन्चार्ज शशी किरण यांनी 'पुढारी,'शी बोलताना दिली. 'भारतातील पहिला 'इरिगेशन रेल्वे टनेल' असल्याचे त्यांनी सांगितले.

असा साकारला टनेल!

या टनेल निर्मितीसाठी जम्मू काश्मीर पासून तर उत्तराखंड पर्यंतच्या २० राज्यांतील सुमारे ४५० कौशल्य व अनुभव असलेले मजूर, कर्मचारी, अधिकारी या प्रक्रियेत सहभागी झाले. १५ एप्रिल २०२५ रोजी टनेल निर्मितीचा पहिला ब्लास्टिंग करण्यात आला. तर तब्बल एक वर्षात १२ मे २०२६ रोजी टनेल पूर्तीचा आनंदी क्षण साजरा करण्यात आला.

प्रवास ठरेल आनंददायी!

पुसद,उमरखेड च्या टप्प्यातील पाच टनेल्सचे काम प्रगतिपथावर आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर नांदेड-वर्धा या संपूर्ण प्रवासात परिसरातील रेल्वे प्रवास निसर्गरम्य व आनंददायी ठरणार आहे. एकीकडे दाट जंगल, वनराई, दुसरीकडे बोगद्यामधून शिट्टी वाजवत पळणारी झुक झुक गाडी या प्रवासाचे आकर्षण ठरणार आहे. ही स्वप्नपूर्ती लवकरच होईल, अशी रेल्वे निगमची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news