

'Vishnupuri' is on the way to be filled with the water of the Poorna River!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा मागील दोन महिन्यांपासून २० ते २३ टक्यांमध्ये वर खाली होणाऱ्या विष्णुपुरी धरणाची पातळी एकाच दिवसात ३५४ मीटरवर पोहोचली, गोदावरीच्या नव्हे तर पूर्णा नदीच्या लाभक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तिथून आलेल्या पाण्याने विष्णुपुरी प्रकल्प भरला आहे. प्रकल्पात ६५.३५ दशलय घनमीटर पाण्याची नोंद गुरुवारी (दि. २४) झाली. ८०.७६ टक्के साठा असून पाण्याची आवक ४७.६३० दशलक्ष घनमीटर या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे आता केव्हाही धरणाचे गेट उघडण्याचा निर्णय पेठला जाऊ शकतो. दरम्यान, गतवर्षी २३ जुलै रोजी विष्णुपुरी भरले होते.
बुधवारी सकाळपर्यंत विष्णुपुरीमध्ये २३.२२ टक्केच साठा होता. परंतु दुपारनंतर अंतेश्वर बंधाऱ्यात राखीव ठेवलेले पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण पूर्णा नदीच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू होता. तिथून पाण्याचा येवा वाढल्याने अंतेश्वर बंधाऱ्याचे पाणी सोडावे लागले, एकदम सोडलेले पाणी मोठ्या प्रमाणात गोदेच्या पात्रात दाखल झाल्याने विष्णुपुरी प्रकल्पाची पातळी ३५४ मीटरवर पोहोचली.
आवकही चांगली सुरु असल्याने सायंकाळपर्यंत विष्णुपुरी भरून त्याचेही गेट उघडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुष्य नक्षत्रामध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली. मागील दीड महिन्यापासून चातकाप्रमाणे पावसाची चाट पाहिली जात होती. हवामान खाते वारंवार पावसाचा अंदाज व्यक्त करीत होते. परंतु तो सतत फोल ठरत होता. या आठवड्याची सुरुवात मात्र जोरदार पावसाने झाली. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास सुरू झालेला पाऊस रिमझिम ते हलका व काही भागात जोरदार प्रमाणात दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरू होता. तेव्हापासून गुरुवारपर्यंत दररोज पावसाची हजेरी कायम आहे.
मंगळवारी (दि. २२) विष्णूपुरी प्रकल्पात केवळ २२.७८ टके जलसाठा होता. जरुन येणारी पाण्याची आवक शून्य होती. परंतु दोनच दिवसांनी गुरुवारी येथे ८० टक्के साठा झाला आहे. दिवसभरात तो जादण्याची शक्यता असून आवक तब्बल ४७.६३० दलघमी या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे दरवाजे केव्हाही उघडावे लागू शकतात, अशी माहिती उप अभियंता अरुण अंकुलवार यांनी दिली. याशिवाय मराठवाड्यातील बहुतेक जलाशयांची स्थिती सुधारत असून प्रत्येक ठिकाणी आवक सुरू आहे. खरे म्हणजे आता खन्या अथनि पावसाळा सुरू झाला आहे.
या आठवडयात सुरू झालेला पाऊस पिकांसाठी उपकारक ठरला आहे. संततधारऐवजी दिवसा ऊन पडत असल्याने शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना सवड मिळते आहे. शिवाय वातावरणात उत्साह निर्माण झाला आहे. सोयाबीनसह सर्वच पिकांची स्थिती चांगली असल्याचे सांगण्यात येते. नांदेड व परिसरात सोयाबीनसह हळद व कापसाचा पेरासुद्धा वाढला आहे. केळी व कस्रासाठी सुद्धा हा पाऊस उपकारक मानला जातो. छोटे नदी-नाल्यांना पाणी आले असून भूजलस्तर उंचावण्यास हा पाऊस मदतगार ठरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.