Nanded News : जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरावीत

अन्यथा जिल्हा परिषदेसमोर १५ सप्टेंबरला ढोल बजाव आंदोलन
Nanded News
Nanded News : जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरावीत File Photo
Published on
Updated on

Vacant posts of teachers and principals in the district should be filled.

नांदेड, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांसोबतच रिक्त पदे भरावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) नांदेड शाखेच्या शिष्टमंडळाच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना निवेदन दिले आहे. १४ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न केल्यास १५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर ढोल बजाव आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Nanded News
Nanded News : विमानसेवा २० सप्टेंबरपर्यंत पूर्ववत होणार

एकूण १६ प्रकारच्या मागण्या असलेले निवेदन नुकतेच प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांना संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पदोन्नत मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, विषय शिक्षकांची पदे तातडीने भरावीत, जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या परंतु अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे पदोन्नती नंतर समायोजन करावे, इयत्ता सहावी ते आठवी अध्यापन करणाऱ्या विषय शिक्षकांना २०१९ पासून प्रलंबित असलेली वेतनश्रेणी द्यावी, सलग १२ वर्ष व २४ वर्ष एकाच पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना चटोपाध्याय व वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी, भविष्य निर्वाह निधी विवरणपत्रातील त्रुटी दुरुस्ती करून विवरणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Nanded News
Illegal Teak Wood Stock | अवैध सागवानाचा साठा जप्त

शिष्टमंडळात यांचा होता समावेश

शिष्टमंडळात शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड, दिव्यांग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंता बैस, माध्यमिक शिक्षक संघटनेचे एम.ए. खदीर, बळवंत मंगनाळे, बालाजी पांपटवार, रवी ढगे, संजय मोरे, रमेश ईटलोड, हणमंत काऊलवार, संजय गंजगुडे, विठ्ठल मुखेडकर आदींचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news