Nanded News : विमानसेवा २० सप्टेंबरपर्यंत पूर्ववत होणार

तिकीट नोंदणी सुरू : धावपट्टीचे काम युद्धपातळीवर
Nanded Air services will be restored by September 20th.
Nanded News : विमानसेवा २० सप्टेंबरपर्यंत पूर्ववत होणार File Photo
Published on
Updated on

Nanded Air services will be restored by September 20th.

नांदेड, पुढारी वृत्तसेवा येथून विविध शहरांना सुरळीत सुरु असलेली स्टार एअर कंपनीची विमानसेवा दि. २२ ऑगस्ट रोजी अचानक निलंबित झाली. धावपट्टी अतिशय धोकादायक झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सर्व स्तरातून वाढलेला दवाव लक्षात घेता बावपट्टी नुतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच ते पूर्ण होऊन दि. २० सप्टेंबरपूर्वी विमानसेथा पूर्ववत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे. स्टार एअर कंपनीने तिकिटांची नोंदणी सुद्धा सुरु केली आहे.

Nanded Air services will be restored by September 20th.
Nanded News : नांदेडमधील 'पीव्हीआर'ला २ कोटींचा दंड

गुर-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या सुमारास नांदेड विमानतळाच्चा मोठा विस्तार झाला होता. त्यानंतर नांदेडएन मुंबई व इतर ठिकाणी विमानसेवा सुरू झाली. दरम्यानच्या काळात शासनाने हे विमानतळ रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले होते. पण या कंपनीचे दिवाळे निघाल्यामुळे अलीकडेच से विमानतळ रिलायन्सकडून परत येऊन ते संचालनासाठी महाराष्ट्र विमानतळ कंपनीकडे देण्यात आले. विमानतळ हस्तांतरण प्रक्रियेच्या वेळेसच एमाएडीसीच्या अधिकाऱ्यांनी धावपट्टीचाबत नाराजी व्यक्त केलों होती. त्यानंतर काही दिवस सेवा सुरु ठेवल्यानंतर दि. २९ ऑगस्टला रात्री विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अचानक घेतलेल्या या निर्णयाचा फटका दुसऱ्याच दिवशी तिकीट बुकिंग असणाऱ्या ग्राहकांना तर बसलाच. परंतु दिवाळी पर्यंतच्या कार्यक्रमांच्या नियोजनावर त्याचा परिणाम झाला. विमानसेवा लवकर पूर्ववत व्हावी यासाठी सर्व स्तरातून दबाव वाढत चालला होता, कदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्यावेळी खा. अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा या विषयाचा आवर्जून उल्लेख केला. दरम्यान, रन-वे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून स्टार एअर कंपनीने दि. १४ पासूनच्या तिकिट नोंदणीला सुद्धा सुरवात केली आहे. असे असले तरी दि. २० सप्टेंबरपूर्वी सेवा पूर्ववत होईल, अशी शक्यता वर्तक्म्यात येत आहे,

Nanded Air services will be restored by September 20th.
Nanded incident : डोंगरगावातील शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर; वीज कोसळून ६ जनावरे दगावली

मुक्तिदिनाचा मुहूर्त साधावा

पुढील आठवड्यात दि. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीदिनाचा मुहूर्त साधून स्टार एअरने नव्या जोमाने पूर्वीच्या सर्व मार्गावर तसेच फ्लाय ९१ या प्रस्तावात असलेल्या कंपनीनेही विमानसेवा सुरु करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, स्टार एअरने १४ सप्टेंबरपासून आगाऊ तिकीट नोंदणी सुरु केली आहे. सध्या पक्ष पंधवडा सुरु असून त्यानंतर लगेचच पर्यटन हंगाम सुरु होणार आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी या कालावधीत प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे विमानतळावरुन सेवा लवकर सुरु होण्याची दाट चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news