Tiranga Bike Rally : महापालिकेच्या 'तिरंगा बाईक रॅलीला' अभूतपूर्व प्रतिसाद

भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासानिमित्त आणि 'वंदे मातरम'च्या १५० व्या वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार देशभरात 'हर घर तिरंगा २०२६' अभियान अत्यंत उत्साहात सुरू आहे.
Tiranga Bike Rally
Tiranga Bike Rally : महापालिकेच्या 'तिरंगा बाईक रॅलीला' अभूतपूर्व प्रतिसादfile photo
Published on
Updated on

Unprecedented response to the Municipal Corporation's 'Tiranga Bike Rally'

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासानिमित्त आणि 'वंदे मातरम'च्या १५० व्या वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार देशभरात 'हर घर तिरंगा २०२६' अभियान अत्यंत उत्साहात सुरू आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून दि.१३.०८.२०२६ रोजी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात एक भव्य आणि अभूतपूर्व 'तिरंगा बाईक रॅली' काढण्यात आली.

Tiranga Bike Rally
Tricolor National Flag : नांदेडमध्ये तयार होणारा राष्ट्रध्वज फडकतोय देशातील १६ राज्यांत

शेकडो दुचाकीस्वार, हातात डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज आणि 'भारत माता की जय'च्या गगनभेदी घोषणा अशा अत्यंत भारावून टाकणाऱ्या वातावरणात ही रॅली संपन्न झाली. या रॅलीने आज संपूर्ण नांदेड शहराला देशप्रेमाच्या रंगात रंगवून टाकले.

Tiranga Bike Rally
Nanded News : राज्यातील आश्रमशाळा म्हणजे असुरक्षित वसतिगृहे !

या अभूतपूर्व तिरंगा बाईक रॅलीची सुरुवात नविन नांदेड भागातील हडको बस स्टॉप पासुन करण्यात आली. हडको चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन केल्यानंतर तिरंगा कॅनव्हसवर स्वाक्षरी करून महापौर कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते संयुक्तपणे रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रस्थान करण्यात आले.

या प्रसंगी उपसभापती निरंजना लांडगे, नगरसेवक संजिव घोगरे, वैजनाथ देशमुख, दिपाली मोरे, प्रभावती कुंजीवाले, अतिरिक्त आयुक्त निलेश सुकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, नितीन गाढवे, स. अजितपालसिंघ संधु, गंगाधर ईरलोड, सहायक आयुक्त मो. गुलाम सादेक, नगररचनाकार ओम लहाने, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ. मिर्झा बेग, क्रिडा अधिकारी रमेश चवरे, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, संघरत्न सोनसळे, सर्व क्षेत्रिय अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह महापालिकेचे इतर विभाग प्रमुख, कर्मचारी आणि शहरातील नामांकित सामाजिक व क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news