Nanded Crime News: जागेच्या वादातून महिलेवर चाकूने हल्ला; मायलेकीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

उमरखेड तालुक्यातील विडुळ येथील आंबेडकर वार्डात जागेच्या वादातून महिलेला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.
Crime News
Crime NewsFile Photo
Published on: 
Updated on: 

Nanded Crime News

उमरखेड : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील विडुळ येथील आंबेडकर वार्डात जागेच्या वादातून महिलेला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तिच्या मुलीलाही मारहाण करण्यात आली. यावेळी एका संशयित आरोपीने चाकूने महिलेच्या डाव्या मनगटावर वार केल्याने ती जखमी झाली. तसेच दोघांनी ‘आमच्या नादी लागली तर जीवे मारून टाकू’, अशी धमकी दिल्याची तक्रार उमरखेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. यावरुन उमरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

जनाबाई बालाजी जाधव (वय ४३, रा. विडुळ) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सिंधुबाई बबन कदम (वय ५५) यांच्यासोबत जागेवरून यापूर्वीही वाद होत होते. ‘तुम्ही आमची जागा हडप केली’, असा आरोप करीत सिंधुबाई या फिर्यादीशी वारंवार वाद घालत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Crime News
Nagpur Crime News: लेकीच्या शरीरावरील खुणा पाहून आईला संशय; घरात CCTV लावला अन् धक्कादायक सत्य समोर, सावत्र वडिलांकडून मुलीवर अत्याचार

१० नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास जनाबाई या आपल्या मुलाला अंघोळ घालत असताना सिंधुबाई बबन कदम व गंगाराम बबन कदम (वय २४) हे दोघे त्यांच्या घरासमोर आले. ‘ मुलाला ओवाळून उंडके त्याच्या घरासमोर का टाकले?’ या कारणावरून दोघांनी जनाबाई यांच्याशी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करीत दोघांनी त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यावेळी जनाबाई यांची मुलगी शितल देशमुख ही आईला वाचविण्यासाठी आली असता दोन्ही आरोपींनी तिलाही चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी गंगाराम कदम याने हातातील चाकूने जनाबाई यांच्या डाव्या मनगटावर वार केला. या हल्ल्यात मनगटातून रक्तस्राव झाल्याने त्या खाली पडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घटनेनंतर दोन्ही आरोपींनी पुन्हा आमच्या नादी लागल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही जनाबाई यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार दिलीप चव्हाण करीत आहेत.

Crime News
Crime News: कुर्ल्यात जुन्या वादातून अंदाधुंद गोळीबार.. ६ महिन्यापूर्वी भावालाही असंच संपवलं होतं

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.