Nanded Crime | उमरखेड बसस्थानक परिसरात चाकू-लोखंडी रॉडने हल्ला; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

Umarkhed bus stand attack- बसस्थानक परिसरात चाकू-लोखंडी रॉडने हल्ला, फोनवरील शिवीगाळच्या वादातून दोघे जखमी
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

उमरखेड : फोनवरून एका विशिष्ट जातीला उद्देशून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर चाकू आणि लोखंडी रॉडने मारहाण झाली. उमरखेड बसस्थानकाजवळ २१ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इस्त्राईल शेख महमूद (वय ५३, रा. रहीम नगर, उमरखेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फोनवरून एका विशिष्ट जातीसंदर्भातील संबोधनात्मक शिवी वारंवार का देतोस, असे विनोद बबन पोंगाणे (वय ५२, रा. शिवाजी वॉर्ड, उमरखेड) यांना विचारण्यात आले. त्यावेळी पोंगाणे यांनी ‘तुम्ही मला हटकणारे कोण, आता तुम्हाला दाखवतोच’, असे म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Crime News
Nanded Accident | खैरगाव पुलावरून दुचाकी खोल दरीत कोसळली; चालक ठार!

त्यानंतर सुमारे दहा मिनिटांनी विनोद पोंगाणे हातात चाकू घेऊन घटनास्थळी आले आणि शेख इस्त्राईल यांच्या डोक्यावर व हातावर चाकूने वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात शेख इस्त्राईल जखमी झाले. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेले अलीमुद्दीन फजलोद्दीन (वय ५८, रा. रहीम नगर, उमरखेड) यांच्या पोटावरही चाकूने वार करून जखमी केल्याचा आरोप आहे. या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी विनोद बबन पोंगाणे यांच्याविरुद्ध आर्म्स ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Crime News
Nanded Reservation Draw | धर्माबाद तालुक्यात ४५ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत; इच्छुकांच्या अपेक्षांना धक्का, नव्या चेहर्‍यांना संधी

दरम्यान, विनोद बबन पोंगाणे यांनीही पोलिसांत स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. फोनवरून शिवी कोणाला देतोस, असे म्हणून शेख इस्त्राईल शेख महमूद व अलीमुद्दीन फजलोद्दीन यांनी कॉलर पकडून गचांडी देत लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

या तक्रारीवरून पोलिसांनी शेख इस्त्राईल शेख महमूद व अलीमुद्दीन फजलोद्दीन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news