Nanded Accident | खैरगाव पुलावरून दुचाकी खोल दरीत कोसळली; चालक ठार!

अपघात रविवारी उघडकीस; मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांची कसरत
Nanded Accident | खैरगाव पुलावरून दुचाकी खोल दरीत कोसळली; चालक ठार!
Nanded Accident | खैरगाव पुलावरून दुचाकी खोल दरीत कोसळली; चालक ठार!
Published on
Updated on

नायगाव : हैदराबाद-नांदेड महामार्गावरील खैरगाव पुलाजवळ धोकादायक वळणावरून दुचाकी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक गंगाधर लक्ष्मण ईबतकर (४०, रा. चुचंद, ता. भैसा, जि. निर्मल) यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, रविवारी पहाटे पाचनंतर ही घटना उघडकीस आली.

नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत खैरगाव पुलाजवळ हा अपघात झाला. दुचाकी (क्र. टीएस १८ एच ५०५४) महामार्गावरील धोकादायक वळणावरून नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले. मात्र, दुचाकी नेमकी कशामुळे अनियंत्रित झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे ५० फूट खोल दरीत दुचाकी आणि मृतदेह असल्याने ते बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. पंचनामा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला व नायगाव येथील रुग्णालयात नेण्यात आला. गंभीर दुखापतीमुळे ईबतकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या अपघातामागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार असून, नायगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सपोनि अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news