Tukaram Mundhe biography : मुंढेंची संघर्षगाथा सांगणाऱ्या 'तुकाराम'ची विक्री लाखाच्या पार!

लेखक - पत्रकार शफी पठाण यांनी साकारलेला त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास 'तुकाराम' या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर
Tukaram Mundhe biography
Tukaram Mundhe bookpudhari photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी

नांदेड : मराठी पुस्तक विश्वामध्ये गेले चार आठवडे चर्चेत असलेल्या 'तुकाराम' या पुस्तकाने एक लाखांहून अधिक प्रतींच्या विक्रीचा टप्पा ओलांडला असून पुढील काळात हिंदी, कानडी आणि गुजराती या भाषांतील अनुवादामुळे तुकाराम मुंढे यांच्या संघर्षाची आणि त्यातून त्यांनी गाठलेल्या ध्येयाची गाथा परराज्यांतही जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सचिव दर्जाचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासनात आयुक्तपदी नेमणूक झाल्यानंतर राज्यभर सुरू झालेल्या वेगवेगळ्या कारवायांची प्रसार माध्यमांमध्ये अनुकूल-प्रतिकूल चर्चा होत असतानाच लेखक - पत्रकार शफी पठाण यांनी साकारलेला त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास 'तुकाराम' या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आला आहे.

Tukaram Mundhe biography
Latur crop damage : सौर प्रकल्पातील तणनाशकाच्या फवारणीने २१ शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त

पुस्तकाच्या आरंभी तांत्रिक बाबींमध्ये नमूद केल्यानुसार 'तुकाराम'ची पहिली आवृत्ती १७ जुलै, २०२६ रोजी प्रकाशित झाली. त्यास एक महिना पूर्ण होण्यापूर्वीच ह्या पुस्तकाने एक लाखांहून अधिक प्रतींच्या विक्रीचा टप्पा पार केला. गेल्या आठवड्यापर्यंत १ लाख २० हजार प्रतींची विक्री झाली, असे मुंढे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक मुंढे यांनी सांगितले. अन्य काही प्रादेशिक भाषांत या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित होणार असल्याचेही त्यांनीच स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यातल्या छोट्याशा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्म. प्राथमिक - माध्यमिक शिक्षण याच गावात. मग तत्कालीन औरंगाबादमध्ये दहावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण, त्यानंतर तुकाराम मुंढे यांची 'करिअर' घडविण्यासाठी सुरू झालेली तयारी, त्यातील चढ-उतार आणि तीन प्रयत्नांनंतर 'यूपीएससी' परीक्षेमधील घवघवीत यश हा त्यांचा प्रवास वरील पुस्तकातून उभा करण्यात आला आहे.

नव्या प्रशासकीय जबाबदारीमध्ये मुंढे यांनी जनतेच्या दैनंदिन आयुष्याला सुरक्षित करण्यासाठी अऩ्नपदार्थातील भेसळीविरुद्ध अत्यंत कठोर पवित्रा घेतल्यामुळे त्यांचे नाव घराघरांत पोहोचले आहे. याच काळात त्यांच्यावरील पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे राज्यभर या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे प्रकाशकांकडून सांगण्यात आले.

मुंढे यांच्या प्रशासकीय सेवेस २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत त्यांच्या वेगवेगळ्या पदांवर सतत बदल्या झाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांची पहिली नियुक्ती २००७ साली नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे सहायक जिल्हाधिकारी या पदावर झाली. त्याआधी त्यांची मिरज आणि मग मेळघाटात नियुक्ती झाली होती; पण रुजू होण्यापूर्वीच आदेशात बदल केले गेले. नंतर देगलूरच्या नियुक्ती आदेशात बदल न झाल्यामुळे त्यांना प्रशिक्षणानंतरच्या पहिल्या नियुक्तीवर रुजू होता आले.

Tukaram Mundhe biography
Hingoli Crime : शहर पोलिसांकडून ८ किलो गांजा जप्‍त

देगलूर येथे रुजू होण्यापूर्वी दोन वेगवेगळ्या नियुक्ती आदेशांनंतर मुंढे यांना उद्विग्न करणारे अनुभव आले. त्यानंतर देगलूरचा आदेश निघाला... याच ठिकाणी पुस्तकाचा समारोप होतो. नंतरच्या २० वर्षांत राज्याने त्यांच्यातील तफडदार, धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष अधिकारी पाहिला.

अभूतपूर्व प्रतिसाद!- मराठीतील अनेक पुस्तकांनी लाख ते दोन - अडीच लाख प्रतींच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. पण मुंढे यांच्यावरील पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. एक महिन्याच्या आतच 'तुकाराम'च्या एक लाखांहून अधिक प्रती वाचकांपर्यंत गेल्या आहेत. कमी अवधीत हा टप्पा ओलांडणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक असावे.

अमृता तांदळे, प्रकाशक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news