Hingoli Crime : शहर पोलिसांकडून ८ किलो गांजा जप्‍त

हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

हिंगोली : शहरातील बसस्थानकासमोरील एनटीसी कमानीजवळ शहर पोलिसांच्या पथकाने एका व्यक्तीच्या संशयावरून त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यातून ८ किलो १३५ ग्राम गांजा जप्त केला. या प्रकरणी मंगळवारी सकाळी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

शहरासह जिल्हाभरातील अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली १३ पोलिस ठाण्यांची पथके कार्यरत ठेवण्यात आली असून त्या सोबत स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके स्थापन केली आहेत.

Crime News
Shahagad stray dog attack : शहागड येथील अकरा वर्षांच्या चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याचा हल्ला

या पथकाकडून जिल्हाभरात अवैध व्यवसायवर छापे टाकले जात आहेत. दरम्यान, हिंगोली शहरातील बसस्थानकाच्या समोरील एनटीसी भागातील कमानीजवळ एका व्यक्तीजवळ गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यावरून पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, उपनिरीक्षक युवराज वाघमारे, जमादार शेख मोहसीन, गणेश लेकुळे, दिलीप लेकुळे, सुनील अंभोरे, अशोक धामणे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एनटीसी कमानीजवळ जाऊन तेथे उभा असलेल्या मौलाखान पठाण (रा. मस्तानशहा नगर, हिंगोली) याच्या जवळील बॅगची तपासणी केली.

Crime News
Jalna dowry case : एक लाखाच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

या बॅगमध्ये गांजा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी बॅगमधून ८ किलो १३५ ग्राम गांजा व एक मोबाईल असा सुमारे २.१५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news