Nanded Triple Murder: नांदेडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित हिंसाचारात तिघांचा मृत्यू; धारदार शस्त्रांचा वापर, गँगवॉरची चर्चा

Nanded Triple Murder: नांदेडमध्ये मध्यरात्री झालेल्या हाणामारीत तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनेमागे गँगवॉरचा संशय व्यक्त होत असला तरी कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Nanded Triple Murder
Nanded Triple MurderPudhari
Published on
Updated on

Nanded Triple Murder: नांदेड शहरात मध्यरात्री भीषण हाणामारीची घटना घडून तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. डी-मार्ट परिसरातील कॅनाल रोडवर पहाटे अंदाजे 2 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गँगवॉर असल्याची चर्चा रंगली आहे.

कॅनाल रोडवर रक्तरंजित हाणामारी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही जणांमध्ये झालेल्या वादातून ही हाणामारी झाली. वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले.

या हाणामारीत धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचेही सांगितले जात आहे.

तिघांचा मृत्यू; एकाचा जागीच अंत

या घटनेत अर्जित सिंग उर्फ अजय चव्हाण, शहाबाज आणि अरबाज यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

Nanded Triple Murder
Mahavitaran News : महावितरणचा पुन्हा भंपकपणा : म्हणे शहरात अखंडित वीजपुरवठा

गँगवॉरचा संशय, कारण अद्याप अस्पष्ट

या हत्याकांडामागे गँगवॉर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हाणामारीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Nanded Triple Murder
वादळी वाऱ्यामुळे आसरखेड्यात दाणादाण

नांदेडमधील या दुर्दैवी घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news