Nanded crime | अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
Crime News
Crime News
Published on
Updated on

नायगाव : अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई दि. ३१ मार्च रोजी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की काही व्यक्ती गावठी पिस्तूल विक्रीसाठी फिरत आहेत. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रल्हाद उर्फ सोनू पंढरी गायकवाड (रा. टाकळी, ता. नायगाव) व रवि धोंडिबा देवकांबळे (रा. महात्मा फुले कॉलनी, नायगाव) यांचा समावेश आहे.

आरोपींकडून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ७/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडारे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत उपनिरीक्षक साईनाथ पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाचा सहभाग होता. दरम्यान, या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news