‌Nanded Legislative Council election : ‘जो देगा उसका भला,जो ना देगा उस पे बला‌’

नांदेड ः अनेक नगरसेवक घोडेबाजाराच्या प्रतीक्षेत
Maharashtra Legislative Council Election
Maharashtra Legislative Council ElectionPudhari
Published on
Updated on

नांदेड ः नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत होत असल्याने या निवडणुकीची रंगत तर वाढलीच शिवाय मतदारांच्या भावही वधारला आहे. इतर निवडणुकीप्रमाणे लढत तुल्यबळ नसली तरी जो देगा उसका भला, जो ना देगा उस पे बला ही अवस्था पहायला मिळणार हे नक्की. महायुतीचे अमरनाथ राजूरकर, महाविकास आघाडी पुरस्कृत कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासह वंचितचे प्रशांत इंगोले निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

पक्षीय बलाबल पाहता महायुतीमध्ये भाजपचे 138,शिवसेनेचे 23 राष्ट्रवादी काँग्रेसचे 84, यासोबतच एमआयएम 20 आणि महाराष्ट्र जनहित पार्टी (मजपा) चे 39 असे भक्कम मताधिक्य राजूरकर यांच्या बाजूने सध्या तरी आहे.

Maharashtra Legislative Council Election
Nanded Legislative Council election : भाजपातर्फे अमरनाथ राजूरकर यांचे नाव फायनल?

या उलट महाविकास आघाडीकडे काँग्रेस 92 शिवसेना (उबाठा) 19 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 13 मतदार आहेत. नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या आणि या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या वंचितकडे अवघे 6 मते असून 13 अपक्ष आहेत.

विधान परिषद निवडणुकीचे एकंदरीत गणित पाहता महायुतीचे अमरनाथ राजूरकर यांचे पारडे भक्कम दिसत असले तरी दिवसेंदिवस राजकीय परिस्थितीही वेगाने बदलत असल्यामुळे निकालाची उत्सुकताही शिगेला पोहोचणार आहे.

Maharashtra Legislative Council Election
Nanded legislative council election : वि.प.निवडणूक : महायुतीत नांदेडची जागा भाजपाला सुटल्यातच जमा!

भाजपातील पक्षांतर्गत धुसफूस आणि उमेदवारी मिळविण्यासाठी काहींनी केलेले टोकाचे प्रयत्न फोल ठरल्यामुळे पक्षातील नाराजविरांचा गट सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षातील आणि मित्र पक्षातील मतदारांना 18 जून पर्यंत सोबत ठेवण्यासाठी राजूरकरांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

  • भाजपा आणि मजपा हे एकाच नाण्याचे दोन बाजू असल्याचे उघड आहे. परंतु भाजपाच्या एकाही नेत्याने अद्याप मजपा नगरसेवकांशी संपर्क केला नसल्याचे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चाही होत असेल परंतु प्रत्येक नगरसेवकाला विश्वासात घेणे आवश्यक आहे अन्यथा वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय आम्हाला बंधनकारक नसेल असेही काही नगरसेवक उघड बोलून दाखवत आहेत. यावरून जो देणार त्यालाच मिळणार या मनस्थितीमध्ये नगरसेवक असल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news