Nanded News : नवीन महापौरांसाठी अधिकृत बंगलाच नाही!

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या तिसाव्या आणि नगर परिषद ते मनपा या प्रवासाच्या ७५ व्या वर्षामध्ये शहराच्या पंधराव्या महापौरांची निवड मंगळवारी होणार आहे
Nanded News
Nanded News : नवीन महापौरांसाठी अधिकृत बंगलाच नाही!File Photo
Published on
Updated on

There is no official bungalow for the new mayor!

संजीव कुळकर्णी

नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या तिसाव्या आणि नगर परिषद ते मनपा या प्रवासाच्या ७५ व्या वर्षामध्ये शहराच्या पंधराव्या महापौरांची निवड मंगळवारी होणार आहे. पण या ऐतिहासिक नगरीच्या नव्या व भाजपाच्या पहिल्या महापौरांसाठी अधिकृत बंगल्याची व्यवस्थाच नसल्याचे समोर आले आहे.

Nanded News
गोड बोलून महिलांच्या टोळीने लांबवले साडेतीन लाखांचे दागिने

नांदेड नगर परिषद १९५२ साली स्थापन झाली; पण नगर परिषद कायद्यात नगराध्यक्षांसाठी बंगल्याची तरतूद नव्हती. त्यामुळे शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते नरेंद्रपाल बरारा यांच्यापर्यंतच्या सर्व नगराध्यक्षांनी आपल्या निवासस्थानांत राहून प्रथम नागरिकाची भूमिका पार पाडली. प्रारंभीच्या काळात नगराध्यक्षांना निवासस्थानी दूरध्वनी जोडणीची सुविधाही नव्हती. वाहन नव्हते. शंकररावांनी तर मानाच्या पदावर असताना कचेरीत जाण्यासाठी सायकल वापरल्याची नोंद आहे.

नव्वदच्या दशकात, १९९९ साली नदिड व वाघाळा या दोन नगर परिषदा विलीन करून या शहरासाठी महानगरपालिका निर्माण केली गेली. पुढे वर्षभरात या विस्तारित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधींची राजवट आली. सुधाकर पांढरे हे या मनपाचे पहिले महापौर झाल्यानंतर महापौर निवास म्हणून श्यामनगर भागातील सध्याच्या महिला रुग्णालयाच्या परिसरातील जुन्या बंगल्याचे नुतनीकरण करण्यात आले. प्रारंभीच्या काळातील काही महापौरांनी या बंगल्याचा वापर केला. पुढे एका बड्या अधिकाऱ्याने या बंगल्याचा ताबा घेत, दीर्घकाळ तेथे वास्तव्य केल्यामुळे हा महापौर बंगला आहे,

Nanded News
Nanded agriculture news | हरभऱ्यावर घाटेअळीचा वाढता प्रादुर्भाव; उत्पादन घटण्याची भीती

याचा सर्वांनाच विसर पहला विशेष मनपाच्या स्थापनेस २९ वर्षे लोटली आहेत. या कालावधीत ६ निवडणुका पार पडल्या. मनपाने स्वतः तसेच बीओटीच्या माध्यमातून शहरामध्ये अनेक इमारती, संकुले बांधली. काही प्रकल्पांत मनपाला पसगशीत उत्पत्र झाले, तरी एवढ्या प्रदीर्घ कालावधीत या संस्थेला महापौर, आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यासाठी सुसज्ज बंगले बांधता आले नाहीत, ही बाब आता समोर आली आहे.

महाराष्ट्रात मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये महापौरांसाठी स्वतंत्र बंगले, नोकरचाकर इत्यादी व्यवस्था आहेत; पण (कै.) शंकरराव आणि खा. अशोक चव्हाण यांच्या कर्मभूमीतील मनपा याबाबतीत दरिदी राहिल्याचे दिसते. मनपा आयुक्तांना बांधकाम खात्याच्या कृपेने स्नेहनगर वसाहतीत एक स्वतंत्र बंगला दिला गेला; पण महापौरांना अजूनही स्वतंत्र सुसज्ज बंगला नाही.

नव्या महापौर कविता संतोष मुळे ह्या पेशाने शिक्षिका, त्यांचे वास्तव्य तरोडा (बु.) भागातील एका बसाहतीत आहे. त्यांच्या निवासाकडे जाणारी रस्ता अत्यंत अरुंद असल्याचे दिसून येते. त्या येत्या मंगळवारी पदग्रहण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या मुख्यालयातील महापौर दालन सज्ज करण्यात आले आहे. महापौरांसाठी वाहन आणि वाहनचालकाची व्यवस्था केली गेली असली, तरी प्रशासनासमोर महापौर बंगल्याचा विषय अद्याप नसल्याची माहिती खुद्द आयुक्तांनी दिली.

मनपाच्या नगरसचिवांकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, मनपा इमारतीसमोरच असलेल्या शासकीय रुणालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बंगल्याची जागा महापौर निवासासाठी दिली जावी व त्याबदल्यात मनपाची श्यामनगर भागातील जागा घेण्यात यावी, असा प्रस्ताव पूर्वी आरोग्य विभागाला देण्यात आला होता; पण त्याचाचत निर्णय झालेला नाही.

मनपात काँग्रेस पक्ष दीर्घकाळ सत्तेत होता. १९९९ ते २०१४ पर्यंत राज्यात याच पक्षाचे सरकार होते. तरी, कारभाऱ्यांनी महापौर बंगल्याच्या विषयात लक्ष घातलेच नाही. आता मनपामध्ये भाजपाची सत्ता येत असून सत्तेत येण्यासाठी या पक्षाने अनेक संकल्प जाहीर केले; पण प्रथम आपल्या महापौरांसाठी किमान सुविधा असलेला बंगला उभारा, अशो टिप्पणी संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news