गोड बोलून महिलांच्या टोळीने लांबवले साडेतीन लाखांचे दागिने

प्रवासात मैत्री नको रे बाबा ! नांदेड-कंधार खासगी बसमधील घटना; सोनखेडमध्ये उतरताच बॅगेसह पोबारा, तिघींवर गुन्हा
nanded  jewelry theft
गोड बोलून महिलांच्या टोळीने लांबवले साडेतीन लाखांचे दागिने(File Photo)
Published on
Updated on

A gang of women stole jewelry worth three and a half lakh rupees by sweet-talking their victims

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :

खाजगी बसने प्रवास करताना सहप्रवासी महिलांशी गप्पा मारणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. नांदेड ते कंधार प्रवासादरम्यान शेजारी बसलेल्या तीन महिलांनी फिर्यादी महिलेशी जवळीक साधून विश्वास संपादन केला आणि संधी मिळताच ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग घेऊन पोबारा केला. याप्रकरणी शनिवारी (दि. ७) सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nanded  jewelry theft
Nanded crime news | पैनगंगा नदी पात्रात मध्यरात्री रेती उपसा

माहितीनुसार, अश्विनी श्रीकृष्ण मंगनाळे (वय २९, रा. जळकोट, जि. लातूर) या खाजगी बसने नांदेडहून कंधारकडे जात होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या तीन महिलांनी त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. गप्पांच्या ओघात त्यांनी अश्विनी यांचा विश्वास संपादन केला. या महिलांनी आपली नावे पुष्पा शैलेंद्र बिसेन, कमलाबाई भगवान चंदेल आणि सुरेखा परिहार (सर्व रा. गाडीपुरा, नांदेड) अशी सांगितली.

बस सोनखेड (ता. लोहा) येथे थांबली असता, या तिन्ही महिला तिथे उतरल्या. खाली उतरताना त्यांनी स्वतःच्या सामानासोबतच अश्विनी यांची दागिन्यांची बॅगही हातचलाखीने सोबत नेली. काही वेळाने आपली बॅग जागेवर नसल्याचे अश्विनी यांच्या लक्षात आले. त्यांनी शोध-ाशोध केली, मात्र तोपर्यंत त्या महिला पसार झाल्या होत्या.

nanded  jewelry theft
न्यायाधीशांच्या दालनात व्हिडिओ शूटिंग; महिला पोलिसाला धक्काबुक्की

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अश्विनी मंगनाळे यांनी सोनखेड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अश्विनी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरील तीन महिलांविर-ोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन किंवा प्रवाशांचे लक्ष विचलित करून दागिने आणि पैसे चोरणाऱ्या महिलांच्या टोळ्या सक्रिय असल्याने प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दिलेली नावे आणि पत्ता खरा की खोटा ?

चोरी करणाऱ्या महिलांनी फिर्यादीला स्वतःची नावे आणि पत्ता (गाडीपुरा, नांदेड) सांगितला होता. मात्र, चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही नावे खोटी सांगितली असण्याची दाट शक्यता आहे. पोलीस आता या नावांच्या आधारे तसेच बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या महिलांचा शोध घेत आहेत. सोनखेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news