

The protective wall of the water purification plant is causing harm to the public.
प्रमोद चौधरी नांदेड : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २९) अतिसृष्टी झाली ऑणि त्याचे नुकसान अनेक शेतकरी तसेच सखल भागात राहणान्या नागरिकांना सहन करावे लागले. मात्र नांदेड शहरातील उच्च समजल्या जाणाऱ्या मोर चौक जवळील रामानंद नगर विस्तारित येथील रहिवाशांना प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका बसला.
नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या शेजारी छत्रपती चौक, वामन नगर, काबरा नगर या परिसरातील पाणी निचरा होण्यासाठी एक मोठा नाला मोर चौक परिसरातून जलशुद्धीकरण केंद्राच्या मागून फरांदे नगर परिसरातून डंकीनच्या दिशेने जाती.
मात्र, जलशुद्धीकरण केंद्राने आपली संरक्षक भिंत बांधताना त्या नाल्यावरही भित उभारली. या कारणाने अनेकदा परिसरात पाणी साचत असे. पण प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधिनी याची कधी दखल घेतली नाही.
जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे नुकत्याच झालेल्या पावसामुळे परिसरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. रस्त्यावर किमान सात ते आठ फूट उंचीपर्यंत पाणी साचले. तर रामानंद नगर विस्तारित येथील घरांमध्ये ४ फूट पाणी शिरले. भयभीत झालेल्या रहिवाशांनी घरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवले. घरातील वस्तू आणि गाड्या वाचवण्याचा प्रयत्न झाला. मात्र नुकसान टाळता आले नाही.
या कॉलनीतील नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले असून, कोणताही लोकप्रतिनिधी किंवा शासनाचा अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. जलशुद्धीकरण केंद्राने उभारलेली ही आरसीसीची भिंत नाल्यावर अडथळा ठरत असल्याने प्रत्येकवेळी परिसरातील पाणी लवकर बाहेर पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
जलशुद्धकरणाची संरक्षक भिंत तत्काळ पाडून नागरिकांचे पुढील होणारे नुकसान व जीवितहानी टाळावी, अशी तक्रार या परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी राहुल कॉले यांच्याकडे केली आहे. प्रशासनाने या विषयाला गांभीयनि घेऊन संरक्षक चिंत तावडीने हटवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
या परिसरातील अनियमित विजपुरवठा, रस्त्यांची अर्धवट कामे, अपुच्या नाल्या, घाणीचे साम्राज्य, विक्रेत्यांचे रस्त्यावरील अतिक्रमन यामुळे दोन वर्षांपासून येथील नागरिक प्रस्त आहेत. पण किमान आमच्या घरात तरी आम्हाला सुरक्षित राहू द्या अशी भावना नागरिकांच्या मनातून या जलप्रलयानंतर उमटली आहे.